Home बीड केज पोलिसांच्या दडपशाही विरोधात पत्रकारबांधवानी तहसीलदारांना दिले निवेदन

केज पोलिसांच्या दडपशाही विरोधात पत्रकारबांधवानी तहसीलदारांना दिले निवेदन

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240322_165134.jpg

केज पोलिसांच्या दडपशाही विरोधात पत्रकारबांधवानी तहसीलदारांना दिले निवेदन

 

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

 

बीड/केज दि: २२ मार्च पोलिसांच्या दडपशाही विरोधात केज येथील पत्रकार एकवटले असुन केज तहसीलदार अभिजीत जगताप यांना केज तालुका सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने लेखी निवेदन दिले आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी की,केज येथे रिक्षा चालवुन आपला उदर निर्वाह चालवणारे एम.सी.एन.न्यूज चैनलचे केज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब मधुकर जाधव हे दिनांक २० मार्च २०२४ रोजी रात्री ८-०० वाजण्या च्या दरम्यान हे पोलीस ठाण्याच्या समोर रस्त्याच्या बाजूला त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवर बातमी तयार करत होते त्या ठिकाणी साध्या ड्रेसवर केज पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रकाश मुंडे यांनी येऊन पारधी समाजाच्या विष प्राशन केलेल्या महिलेला दवाखान्यात घेऊन चल असे म्हणाले. नंतर पत्रकार बाळासाहेब जाधव यांनी मी बातमी तयार करत असून आपण इतर रिक्षा पहावा म्हटल्यावर पोलीस हवालदार प्रकाश मुंडे यांनी बाळासाहेब जाधव यांना शिवीगाळ करून मारहाण केली व पञकार बाळासाहेब जाधव यांच्या गचूऱ्याला धरून पोलीस ठाण्यात रात्री ११-०० वाजेपर्यंत बसवुन ठेवले. बाळासाहेब जाधव यांना मानसिक त्रास,शारीरिक त्रास दिला म्हणून सदरील पत्रकाराला मारहाण करणाऱ्या प्रकाश मुंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणी साठी केज येथील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने अशा मागणीचे लेखी निवेदन पोलीस संचालक श्री.छत्रपती संभाजी नगर, पोलीस अधीक्षक बीड,पोलीस उप अधीक्षक उपविभागीय कार्यालय केज,तहसीलदार केज यांना दिले आहे.सदरचे निवेदन केज तहसीलचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी स्वीकारले आहे.या लेखी निवेदनावर पत्रकार दशरथ चवरे, विजय आरकडे,अजय भांगे,अशोक सोनवणे, महादेव काळे,तात्या गवळी,बाळासाहेब जाधव, मुबाशीर खतीब, इत्यादी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पत्रकार बाळासाहेब जाधव यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात केज तालुका सर्व पत्रकार बांधव एकवटले असून सर्व पत्रकार बांधवांनी बाळासाहेब जाधव यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व केज पोलिसांची दडपशाही लवकरात लवकर थांबवावी अशी सर्व पत्रकार बांधवांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here