Home बीड वाळू डेपोसाठी जिल्हा प्रशासनाने काढले टेंडर; २० मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने उघडल्या...

वाळू डेपोसाठी जिल्हा प्रशासनाने काढले टेंडर; २० मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने उघडल्या जाणार निविदा

39
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_075936.jpg

वाळू डेपोसाठी जिल्हा प्रशासनाने काढले टेंडर; २० मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने उघडल्या जाणार निविदा

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि: १६  जिल्हा प्रशासन उत्खनन करून वाळू डेपोसाठी ऑनलाईन पद्धतीने टेंडर काढले आहे. ०१ ते १८ मार्च या कालावधीत टेंडर स्वीकारले जाणार असून २० मार्च रोजी प्राप्त निविदा उघडल्या जाणार आहेत. मागच्या वर्षी तीन वेळा टेंडर काढून हे केवळ एकाच ठिकाणी वाळू डेपोसाठी दिला गेला होता. यंदा किती ठिकाणच्या वाळू डेपोसाठी निविदा प्राप्त होतात व किती निवेदना मंजुरी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. २०२३ मध्ये राज्य शासनाने सर्व सामान्यांना कमी दरात मिळावी यासाठी ६०० रुपये भाव निश्चित केला होता. त्यानुसार वाळू डेपोसाठी टेंडर मागण्यात आले होते. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वाळू डेपोला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा वाळू टेंडर करण्यात आले होते. शासन निर्णयानुसार २०२३ मध्ये वाळू उत्खनन करून डेपोपर्यंत नेण्यासाठी जो खर्च होता तो जिल्हा प्रशासन दिला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना ६०० रुपये ब्रासने वाळू मिळाली होती. परंतु यंदा नियमात बदल करण्यात आला असून ६०० रुपये ब्रास व टेंडरसाठी मंजूर होणारा प्रति ब्रासचा खर्च ग्राहकांच्या खिशामधून घेतला जाणारआहे. त्यामुळे ग्राहकांना जवळपास २००० रुपये ब्रास प्रमाणे वाळू मिळणार आहे. तसेच ग्राहकाने विकत घेतलेली वाळू डेपोपासून घरापर्यंत आणण्याचे वाहन भाडे वेगळे द्यावे लागणार आहे. एकंदरीत मागच्या वेळेपेक्षा अधिक दराने वाळू खरेदी करावी लागणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील पात्र व पाणीसाठा क्षेत्रामधील गाळमिश्रित वाळू उत्खनन करून या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक करण्यासाठी व डेपो निर्मिती व्यवस्थापनासाठी जिल्हा शासनाच्या वाळू डेपोसाठी टेंडर काढण्यात आले आहे.

Previous articleग्राहक सेवा संस्थेचा जागतिक ग्राहक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला
Next articleशिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here