Home नाशिक तीर्थ क्षेत्र गुप्तेश्वर महादेव देवस्थान वडपाटी येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..!!

तीर्थ क्षेत्र गुप्तेश्वर महादेव देवस्थान वडपाटी येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..!!

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_090143.jpg

तीर्थ क्षेत्र गुप्तेश्वर महादेव देवस्थान वडपाटी येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..!!

येवला, दिपक कदम प्रतिनिधी 
येवला तालुक्यातील राजापुर, ममदापूर येथील वडपाटी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सालाबादप्रमाणे यंदाही वडपाटी येथे गुप्तेश्वर महादेव देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय जय घोषणाने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. राजापूर गावातून पायी दिंडी काढून थेट वडपाटी येथील गुप्तेश्र्वर महादेव मंदिरातपर्यंत दिंडी आली. तसेच मंदिरात अभिषेक करण्यात आला.तसेच भाविकांनी कोपरगाव येथुन पायी कावडीने पाणी आणुन मोठ्या उत्साहात वाजत गाजत कावडी मिरवणुक काढण्यात आली. पिंडीला अभिषेक स्नान घातले. प्रसंगी ह.भ.प माधुरी ताई शेरेकर सावरगावकर यांचे नामसंकीर्तन झाले. त्यांना महिला भजनी मंडळ यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी आमदार नरेंद्र दराडे, माजी सभापती डॉ सुधीर जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तजन या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.आलेल्या भाविकांना महाफराळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन गुप्तेशवर महादेव मित्र मंडळ ममदापूर,राजापूर पंचक्रोशीतील तरुण मित्र मंडळांनी विशेष परिश्रम घेतले..

Previous articleआजपासून नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर शिवगर्जना गरजणार
Next articleकायद्यात दुरूस्ती करून केंद्र सरकारने मराठ्यांना टिकाऊ आरक्षण द्यावे – डॉ संजय लाखेपाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here