Home उतर महाराष्ट्र इंकलाब जिंदाबादच्या नाऱ्यात पहिले राज्य अधिवेशन संपन्न !

इंकलाब जिंदाबादच्या नाऱ्यात पहिले राज्य अधिवेशन संपन्न !

46
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_074348.jpg

इंकलाब जिंदाबादच्या नाऱ्यात पहिले राज्य अधिवेशन संपन्न !                                                          श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी 

क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेड संलग्न इंकलाबी नौजवान सभा (RYA) पहिले राज्य अधिवेशन श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे संपन्न झाले. इंकलाबी नौजवान सभेचे महासचिव कॉ. नीरज कुमार, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघांचे कॉ. उदय भट, लाल निशाण पक्षाचे सचिव मंडळ सदस्य कॉ. अतुल दिघे कॉ. बाळासाहेब सुरूडे, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. सतीश सर्वगुडे, कॉ. मदिना शेख, कॉ. मधुकर नरसिंगे, कॉ. शरद संसारे, कॉ.जीवन सुरूडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले राज्य अधिवेशन पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शहरातून बाईक रॅली काढण्यात आली होती. अधिवेशनाच्या सुरुवातीला मी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. आजच्या अधिवेशनात १७ जणांची राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये माझी राज्य सरचिटणीसपदी आणि कॉ. सतीश सर्वगुडे यांची राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
येत्या २०२४ च्या निवडणुकीत युवकांच्या प्रश्नांवर न बोलणाऱ्या सरकारला विरोध करायचा, सन्मानजनक रोजगार मिळण्याची मागणी सर्वांची असली पाहिजे, जातीचे – धार्मिक द्वेषाचे राजकारण बंद करुन सन्मानाचे जगण्यासाठी लढा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. श्रीकृष्ण बडाख पाटील यांनी केले आणि आभार कॉ. शरद संसारे यांनी मानले.

Previous articleकारेगावला कबड्डी किट साहित्य वाटप
Next articleश्रीरामपूरच्या चारही बाजूचे रस्ते चौपदरी केले – आमदार कानडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here