मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
मुखेड मौजे बाराहाळी येथे मुखेड तालुक्याचे लाडके कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते ओम साईराम धनवंतरी हॉस्पिटल चे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. मुखेडतालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेली बाराहळी येथे डॉ. संदीप रामराव पवार यांनी ओम साईराम धनवंतरी हॉस्पिटल ची उभारणी केली. या हॉस्पिटलचे उद्घाटन मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले. याव यावेळी बाराहाळी ग्रामपंचायत येथील उपसरपंच शेखर जी देशमुख भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गज्जलवाड सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी बालाजी पाटील सकनुर कर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉ. तुषार जी यांनी बाराहाळीयेथील व्यापाऱ्यांची भेट घेऊन दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या