Home Breaking News चिंताजनक” नांदेड जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा ३० रुग्णांची भर, एकाचा मृत्यू – ...

चिंताजनक” नांदेड जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा ३० रुग्णांची भर, एकाचा मृत्यू – नांदेड,दि. ९ ; राजेश एन भांगे

127
0

चिंताजनक” नांदेड जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा ३० रुग्णांची भर, एकाचा मृत्यू –
नांदेड,दि. ९ ; राजेश एन भांगे

कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 12 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 353 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत.
विजयनगर येथील 75 वर्षाचा एका पुरुषाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. या बाधितावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधिताला उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्यू बाधितांची संख्या 24 एवढी आहे.
गुरुवार 9 जुलै 2020 रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 112 अहवालापैकी 90 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. यात नवीन 13 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले होते. तर रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान आणखी 107 अहवाल प्राप्त झाले आहेत, त्या मध्ये 72 निगेटिव्ह, तर 17 व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह आढळून आले आहेत, त्यामुळे‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 541 एवढी झाली आहे.

✔️ नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दि 9 जुलै रोजी नोंद झालेल्या सर्व कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे :

☑️ देगलूर नाका येथील 25 वर्षाचा 1 पुरुष,

☑️नांदेड तालुक्यातील वाघी येथील 25 वर्षाची 1 महिला,

☑️ मुखेड नाथनगर येथील 6 महिन्याचे 1 बालक व 31 वर्षाची 1 महिला तसेच मुदखेड येथील 33 वर्षाचा 1 पुरुष यांच्या समावेश आहे व सर्व बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
(नमूद सर्व 5 बाधितांचा अहवाल 8 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे.)

☑️तसेच चाळीसगाव येथील 30 वर्षाचा 1 पुरुष,

☑️लक्ष्मीनगर येथील 24, 27 व 45 वर्षाच्या 3 महिला,

☑️नवीन हस्सापूर येथील 45 वर्षाची 1 महिला,

☑️मोहसीन कॉलनी 47 वर्षाची 1 महिला,

☑️धनगर टेकडी नांदेड येथील 42 व 45 वर्षाचे 2 पुरुष यांचा समावेश आहे.

(नमूद सर्व 8 बाधितांचा अहवाल 9 जुलै रोजी सायं 5.30 वा. प्राप्त झाला आहे.)

☑️गांधीनगर ता.बिलोली, जि. नांदेड एक 16 वर्षीय तरुण.

☑️फारुकी गल्ली, नांदेड एक पुरुष रुग्ण वय : 28.

☑️वाघाळा नांदेड, एक पुरुष रुग्ण वय : 41,

☑️गोकुळ नगर, नांदेड एक पुरुष वय : 47.

☑️व्यंकटेश नगर, मुखेड, जि. नांदेड दोन पुरुष रुग्ण वय .

☑️तगलीन गल्ली, ता.मुखेड 5 पुरुष रुग्ण वय : 45, 43, 16, 27 व एक 27 वर्षीय बालक.

◾️व तसेच 6 महिला रुग्ण वय : 35, 43, , 28, 30, 9,व 13 वर्षच्या दोन मुली.

(नमूद सर्व 17 बाधितांचा अहवाल 9 जुलै रोजी रात्री 8:00 वा. प्राप्त झाला आहे.)

आतापर्यंत 524 बाधितांपैकी 353 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 24 बाधितांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा प्रतिसाद झाला आहे. उर्वरीत 164 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 18 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 10 महिला बाधित आणि 8 पुरुष बाधित यांचा समावेश आहे.तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 2 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.

9 जुलै 2020 रोजी 248 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

✅️नांदेड आरोग्य विभागाचे महत्वाचे आवाहन!

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Previous articleचांदवड तालुक्यातील 2 रुग्णाची वाढ प्रतिनिधी:- प्रविण अहिरराव चांदवड
Next articleनाशिक सटाणा तालुक्यातील केळझर, वाठोडा, तताणी,भावनगर व आसपासच्या परिसरातील युवा मराठा न्युज रिपोर्टर समाधान बहिरम केळझर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here