Home नांदेड विकास कामांच्या बळावर आणि जनसंपर्काच्या जोरावर खा.चिखलीकरांना पक्षश्रेष्ठी निश्चित उमेदवारी देईल असा...

विकास कामांच्या बळावर आणि जनसंपर्काच्या जोरावर खा.चिखलीकरांना पक्षश्रेष्ठी निश्चित उमेदवारी देईल असा ठाम विश्वास.

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_073501.jpg

विकास कामांच्या बळावर आणि जनसंपर्काच्या जोरावर खा.चिखलीकरांना पक्षश्रेष्ठी निश्चित उमेदवारी देईल असा ठाम विश्वास.

भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर :-विद्यमान खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विकासात्मक दूरदृष्टी कामावर विश्वास ठेवून भाजपाच्या वतीने पुनश्च एकदा नांदेड लोकसभेसाठी खा.चिखलीकर यांचीच उमेदवारी निश्चित केली जाईल असा विश्वास व्यक्त केला.
देशाचे प्रभावशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील होणाऱ्या ऐतिहासिक महाविजया मध्ये आपले योगदान देण्यासाठी भाजपा ला पुनश्च एकदा
बहुमताने मतदान करावे असे आवाहन खा.चिखलीकरांची सावली म्हणून वावरणाऱ्या नांदेड जिल्हात नेहमी सातत्याने जनतेच्या जनसंपर्कात राहणाऱ्या भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिता देवरे-चिखलीकर यांनी केले आहे .

खासदार निधीतून दिलेल्या सुमारे साडे दहा कोटी रुपयांच्या निधीच्या ग्राम विकास कामाचे भूमिपूजन मंगळवार दि 5 मार्च रोजी करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी भाजपा लोकसभा प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर ,तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत पाटील राजूरकर उपसभापती एडवोकेट रवी पाटील नरंगलकर , माजी तालुकाध्यक्ष शिवाजी शिवाजी मामा कनकंटे,भाजपा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नारलावार, भाजपा सरचिटणीस अशोक साखरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका नामदेव थडके देगावकर, पंकज देशमुख आदींची उपस्थिती होती .
सौ.प्रणिता देवरे -चिखलीकर पुढे म्हणाल्या की,गेल्या पाच वर्षात खासदार चिखलीकर हे सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू समजून कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून ग्राम विकासाचा अजेंडा राबविला आहे.तोच अजेंडा कायम राखण्यासाठी
त्यांच्या कार्यपद्धतीची पोचपावती म्हणूनच नांदेड लोकसभेची उमेदवारी भेटेल त्यामुळे गेल्या लोकसभेप्रमाणेच याही वेळी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुन्हा भाजपालाच लीड द्यावे असे आवाहन केले.दरम्यान देगलूर तालुक्यातील नरंगल येथे 1 कोटी 20 लक्ष , मरखेल येथे 3 कोटी 67 लक्ष , शहरातील महात्मा फुले नगर देगाव रोड या दलित वस्तीच्या मुख्य रस्त्याच्या बांधकामासाठी 90 लक्ष रुपये, बापू नगर येथील गजानन मंदिर परिसरात फेवर ब्लॉकसाठी 20 लक्ष, साई मंदिर सभा मंडपासाठी 20 लक्ष,कुंभार गल्लीत 10 लक्ष रुपयांचे सी. सी. रस्ता यासह विविध गल्लीमध्ये रस्ता व नालीच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या खासदार निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी शहराध्यक्ष अशोक गंपवार , दिगंबर कौरवार, शहराध्यक्ष प्रशांत दासरवार,अशोक कांबळे,किरण उल्लेवार, अमित पेंडकर ,कुणाल गवलवाड ,सारंग देगावकर, आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Previous articleआमदार मंगेश चव्हाण भाऊबीज सोहळा ठरला हजारो आशा –अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोठा आधार,
Next articleकारेगावला कबड्डी किट साहित्य वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here