Home सामाजिक कथा -ऋणानुबंध

कथा -ऋणानुबंध

174
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_200238.jpg

कथा -ऋणानुबंध

“परत एकदा मुलगी जन्माला घातलीस तू! माहित नाही माझ्या मुलाचं कसं होणार?बिचारा माझा पोरगा! एक मुलगा देऊ शकत नाही तू तर काय उपयोग तुझा?मुलींनाच जन्म देते आहे फक्त.माहित नाही मी हिच्याशी माझ्या मुलाचे लग्न का लावून दिले?” दवाखान्यात कमला काकू मोठमोठ्याने आपल्या नुकत्याच बाळंत झालेल्या सुनेवर ओरडत होत्या.आजूबाजूचा स्टाफ त्यांच्याकडे जरा रागानेच पहात होता.
अंजलीला पहिलेच दोन मुली होत्या, भावना आणि कल्पना.तिस-या मुलीचा आजच जन्म झाला होता.सून दवाखान्यात होती,पण कमलाकाकूंना सुनेची अजिबात काळजी नव्हती.त्यांनी तर नवीनच जन्माला आलेल्या मुलीला हातात पण घेतले नाही.त्यांनी पूर्ण दवाखाना डोक्यावर घेतला होता आणि आपल्या नशिबाला दोष देत रडत होत्या.त्यांना तर ही चिंता होती की घराचा वारसा पुढे कोण चालवणार?चार-पाच दिवसांनी अंजली आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला घेऊन सासरी आली.ती घरी आल्यावर सुध्दा कमलाकाकूंचे तिला टोमणे मारणे चालूच होते.” मी पहिलेच म्हटले होते की एकवेळा सोनोग्राफी करून घेऊ.पण तू इतकी जिद्दी आहेस की माझे काही ऐकले नाही.माझे नाही तर आपल्या नव-याचे तरी ऐकायचे होते.जर पहिलेच माहित झालं असतं की तुझ्या पोटात मुलगी आहे,तर तेव्हाच गर्भपात करून टाकला असता.कशाला ही ब्याद जन्माला आली असती!”कमलाकाकू रागाने फणफणत बोलत होत्या.
काही वर्षे लोटली.तिन्ही मुली खूप हुशार निघाल्या.मोठ्या दोन्ही मुली भावना आणि कल्पना इंजिनिअर झाल्या.दोघींनाही मल्टी नॅशनल कंपनीत जाॅब मिळाला.सर्वात लहान मुलगी ममता डोळ्यांची डाॅक्टर झाली.तिने दोन्ही बहिणींच्या मदतीने डोळ्यांचा दवाखाना काढला.एक दोन वर्षांतच ती डोळ्यांची प्रसिद्ध डॉक्टर म्हणून ओळखल्या जाऊ लागली.एकदा ममताला तीन-चार सेमिनार अटेंड करायला हैद्राबादला जावे लागणार होते.ममता तिच्या सेमिनारसाठी हैद्राबादला निघून गेली.त्यानंतर साधारण आठवडाभराने कमलाकाकूंना डोळ्यांचा त्रास व्हायला सुरुवात झाली.दुस-या डाॅक्टरकडून तपासणी करून घेतल्यावर कळले की त्यांना दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू झाला होता आणि ऑपरेशन करणे गरजेचे होते.डोळ्यांचा त्रास वाढत चालला होता.” आई, तुला मी दवाखान्यात भर्ती करतो.आपण लगेच तुझे ऑपरेशन उरकून घेऊ.छोटेसे ऑपरेशन आहे.घाबरण्याची गरज नाही.”कमलाकाकूंचा मुलगा म्हणाला.कमलाकाकू मुलाचे ऐकायला तयार नव्हत्या.त्या आपल्या मुलाला म्हणाल्या -“नको रे बाबा,एकतर ममता इथे नाही.तिला पहिले येऊ दे.मग बघू ऑपरेशनचे.ममता आल्याशिवाय मी काही ऑपरेशन करणार नाही.ती खूप चांगली डॉक्टर आहे.” “अगं आई! शहरात दुसरे पण चांगले डॉक्टर आहेत.तू घाबरते कशाला?” कमलाकाकूंचा मुलगा निशिकांत त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणाला.” माझा नाही दुस-या डॉक्टरवर विश्वास.कोणी कितीही चांगला डॉक्टर असला तरी मला फक्त ममताच्या हातानेच माझे डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे.तिचे किती नाव आहे आज आपल्या शहरात.तुला पण सर्व डॉक्टर ममताचे वडील म्हणून ओळखतात.” कमलाकाकू निशिकांतला म्हणाल्या.आज कमलाकाकूंच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणि आनंद होता.त्यांना आपल्या तिन्ही नातींचा खूप अभिमान वाटत होता.” माझे खरे तर चुकलेच.मुली झाल्या म्हणून मी अंजलीला किती बोलले.तिला नेहमी टोमणे मारले.नेहमी मुलींना मुलांपेक्षा कमी समजले.पण आज माझ्या लक्षात आलं आहे की मुलीही मुलांपेक्षा कशातच कमी नाहीत.मला माझ्या तिन्ही नातींचा खूप अभिमान आहे.” कमलाकाकू रडत बोलल्या.इतक्यात ममताचा फोन आला.अंजलीने आपल्या सासूला फोन देत म्हटले,”ममताचा फोन आहे आई,तुमच्याशी बोलायचं आहे तिला.” कमलाकाकूंनी फोन घेतला आणि तिकडून ममता बोलली,” कशी आहे आजी तू?आईने सांगितले की तुझ्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे.तू ऑपरेशन करून घे.मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना फोन करून देईल.सगळं काही व्यवस्थित होईल.” ममताने आजीला समजावत म्हटले.” मी नाही करणार दुसऱ्या कुणाच्या हाताने ऑपरेशन.तू आली की तुझ्या हातानेच मी ऑपरेशन करणार.” कमलाकाकू नातीला म्हणाल्या. यावर ममता म्हणाली,” ठीक आहे आजी.मी पंधरा दिवसांनी येते आहे वापस.तोपर्यंत तू डोळ्यांत औषध टाकत जा.काळजी करू नकोस.मीच करील तुझं ऑपरेशन.” नातीचे बोलणे ऐकून कमलाकाकूंचा चेहरा आनंदाने फुलला.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleसंपन्न भारतासाठी कृषी स्तंभ बळकट करण्याचे सत्त्य केव्हा स्विकारणार? ….मयुर खापरे चांदुर बाजार
Next articleआई आणि मुलगा कुणालने प्रथमकच रक्तदान करून केले पुण्याचे काम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here