• Home
  • पुण्यात स्वॅब कलेक्शन आता बसमधूनही !

पुण्यात स्वॅब कलेक्शन आता बसमधूनही !

⭕ पुण्यात स्वॅब कलेक्शन आता बसमधूनही ! ⭕
पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे -: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढला असताना. कंटेन्मेंट क्षेत्रातील नागरिकांची जास्तीत जास्त प्रमाणात तपासणी करण्यासाठी, आपल्या महापालिकेने क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर प्रा.लि. पुणे यांचेकडून सर्व प्रकारच्या सुविधा असलेली वातानुकूलित लॅब बस तयार करून घेतले आहे. या लॅबमध्ये एक्स-रे मशीन, स्वॅब कलेक्शन, पॅथॉलॉजी लॅबची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे लवकरात लवकर रुग्णाचा निदान होण्यास मदत होणार आहे. आज या वातानुकूलित लॅब बसचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, कार्यकारी उपाध्यक्ष अनिल साळुंखे, पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ अंजली साबणे, डॉ वैशाली जाधव, पालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या वातानुकूलित लॅब बसद्वारे बाधीत क्षेत्रात सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अजून एक चांगली अत्याधुनिक पद्धतीची यंत्रणा कोरोना विरुद्धच्या लढ्यात राबविण्यात येणार आहे. त्याबद्दल पालिकेचे व क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरचे समस्त पुणेकरांकडून मनःपूर्वक आभार..!

anews Banner

Leave A Comment