• Home
  • बातमीचा धसका घेत पारे गावात प्रशासकीय यंत्रणा झाली खडबडून जागी

बातमीचा धसका घेत पारे गावात प्रशासकीय यंत्रणा झाली खडबडून जागी

★ बातमीचा धसका घेत पारे गावात प्रशासकीय यंत्रणा झाली खडबडून जागी ★

( जिल्हा परिषद सभापती मा.अनिल मोटे यांनी दिली पारे गावाला धावती भेट )

सांगोला – चाँद शेख
कोरोना व्हायरसने सर्व जगभरच थैमान घातलंय. मात्र सांगोला तालुक्यातील पारे गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे गांभीर्य ग्रामपंचायत ने गावातील स्वघोषित आजी माजी पदाधिकाऱ्यांना गावकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता तर दुसरीकडे बोटावर मोजता येतील इतकेच अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून आपले काम करीत आहेत .याचे दखल घेत बातमी प्रकाशित केल्यानंतर काही क्षणात प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि उपाययोजना करण्यासाठी सज्ज झाली आहे विशेषतः आज सोलापूर जिल्हा परिषद चे कर्तृत्वदक्ष सभापती अनिल भाऊ मोटे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांच्या कामाची चांगलीच उजळणी घेतली .कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा दम हि दिला .

पारे गावात गेल्या दोन तीन दिवसात अनेक लोक मुंबईहून गावाकडे आल्या आहेत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा सोडा पिण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध नव्हते . शौचालय चे सोय नव्हती , पारे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते . त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य इतर स्वघोषित पुढारी गावकऱ्यांच्या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत होत्या . वेळकाढूपणा करीत होते. पारे गावातील सर्वसामान्य लोकांनी वारंवार ग्रामपंचायत कडे तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करता दुर्लक्ष केले जात होते अखेर लोकांनी आमच्या विशेष प्रतिनिधी कडे धाव घेतली आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारे गावाला वाली कोण ? ग्रामसेवक पोलीस पाटील वगळता इतर अधिकारी राखतात उंटावरून शेळ्या अशी बातमी प्रकाशित केल्या नंतर बातमी चा धसका घेत काही क्षणातचं ग्रामपंचायतच्या वतीने टिएसल लिक्विडची फवारणी करण्यात आली .गावचे माजी सरपंच संतोष पाटील आणि सीबीएस न्यूज चे संपादक चाँदभैय्या शेख , बाळासाहेब गायकवाड, संतोष गायकवाड ,संजय गायकवाड ,बंडू गायकवाड ,समाधान गंगणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेले शौचालयची सुमारे दोन तास स्वच्छता करून वापरणे योग्य केले आहे .तसेच त्या विलगीकरण कक्षेत कर्तृत्वदक्ष ग्रामसेवक पिसे भाऊसाहेब यांनी पाण्यासाठी १००० लिटरची पाण्याची टाकी बसवली आहे .तसेच काही प्रमाणात विलगीकरण कक्षेत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत .विशेषतः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेले अधिकारी कर्मचारी उपस्थित राहिले होते .त्यामुळे सीबीएस न्यूज मराठी व दैनिक सांगोला सुपरफास्ट चे सर्वसामान्य जनतेतून कौतुक केले जात आहे .मात्र बातम्या प्रकाशित होण्याआधीच प्रशासकीय यंत्रणा व पुढाऱ्यांनी या सर्व बाबींकडे लक्ष दिले असते .बदनामीची वेळ आली नसती हि शंभर टक्के खरे आहे शेवटी इतकेच कि ज्या ज्या वेळी प्रशासकीय यंत्रण आणि पदाधिकारी यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला त्रास दिला जाईल त्यावेळी प्रत्येकाला त्याचे परिणाम भोगावे लागतील .सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी पत्रकारिता केली जाते हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

anews Banner

Leave A Comment