आशाताई बच्छाव
नागरिकांनो सावधान…!
मालेगावात साई सेलिब्रेशनमध्ये घुसला बिबट्या….
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी )
मालेगाव – यंदा पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासूनच जाणवायला सुरुवात झालेली असून, त्याचा परिणाम वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ आता नागरी वसाहतीमध्ये शिरकाव करू लागले आहेत.मात्र या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते.
मालेगाव तालुक्यातील वनविभागाच्या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर असून, बहुतेक ठिकाणी पाणवठे नसल्यामुळे वन्यप्राणी आता पाण्याच्या शोधार्थ नागरी वसाहतीमध्ये शिरकाव करीत आहेत.याबाबत खात्रीशीर माहिती अशी की,आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नामपूर रोडवरील साई सेलिब्रेशन या लान्स मध्ये बिबट्याने शिरकाव केल्याने एकच घबराट निर्माण होऊन बघ्याची मोठी गर्दी उसळली होती.परिणामी वनविभागाने वन्यप्राण्यानी नागरि वसाहतीमध्ये शिरकाव करू नये म्हणून यासाठी जंगलात वन्य प्राण्यांसाठी उपाययोजना करण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.