Home उतर महाराष्ट्र सोनई महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा…

सोनई महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा…

59
0

आशाताई बच्छाव

IMG_20240227_204004.jpg

सोनई महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा…..                                                        सोनंई,(कारभारी गव्हाणे)आज मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग अंतर्गत दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी स. ०९:०० वा. मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी डॉ. बाळासाहेब खेडकर यांनी करून दिला. ज्ञानेश्वर माऊली व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते कवी डॉ. विष्णू सुरासे सर यांनी मराठी भाषेला सोन्याचे दिवस आणण्याचे काम कुसुमाग्रजांनी केलं, त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये असणारे इतर साहित्य प्रकार त्यामधील मी आणि माझी विनोदी कविता या विषयावर त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे सर यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये मराठी भाषेतील विविध प्रादेशिक भाषांचा वापर केलाआणि मातृभाषेचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य यांनी मनोगतामध्ये मराठी भाषेची सुरुवात ही शिलालेखातून झालेली आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. राहुल निपुंगे सर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. तुकाराम जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संदीप खेडकर, सोपान दरंदले तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

Previous articleबेलोरा विमानतळावरून नाईट लँडिंग व मराठी भाषा विद्यापीठासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद
Next articleमराठी भाषा दिन विशेष — कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवस–
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here