Home जळगाव बनावट वेबसाईटमुळे चाळीसगावचे इसमाचे बँक खाते रिकामे होण्यापासून वाचले

बनावट वेबसाईटमुळे चाळीसगावचे इसमाचे बँक खाते रिकामे होण्यापासून वाचले

55
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_080135.jpg

बनावट वेबसाईटमुळे चाळीसगावचे इसमाचे बँक खाते रिकामे होण्यापासून वाचले

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- बुट खरेदी करण्यासाठी एका व्यापाऱ्याने ऑनलाईनवर जावून एका बुट कंपनीवर बुट मागवले. त्यासाठी व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून 379 रूपये कापले देखील गेले. मात्र ही वेबसाईट बनावट असल्याची शंका येताच व्यपाऱ्याने आपली सर्व बॅेक खाते गोठवून घेतले. त्यामुळे व्यापाऱ्याच्या खात्यातून बोगस ऑनलाईन कंपनीकडून पैसे वळते होण्याचा प्रसंग टळला. याबाबत व्यापाऱ्याने या बोगस ऑनलाईन वेबसाईटबाबत शहर पोलीसांकडे तक्रार केली.
वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमुळे नागरीकांनी कुठल्याही वस्तु ऑनलाईन मागवतांना संबंधीत वेबसाईट अधिकृत आहे की नाही याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.
येथील औषध विक्रेते सुभाष कन्हैय्यालाल बजाज यांनी गुगल सर्चवरून फ्लिपकार्ट लाईव्ह सेल या कंपनीमार्फत ऑनलाईन बुट मागवले. त्यासाठी या कंपनीकडून या औषध विक्रेत्याच्या बँक खात्यातून 369 रूपये वळते देखील झाले. मात्र ज्या कंपनीकडून बुट मागवायचे आहेत ती वेबसाईट बनावट असल्याचे व आपली फसवणुक झाल्याचे त्यांचे लक्षात येताच त्यांनी आपल्या बँक खात्यांमधून आणखी पैसे वळते होण्यापूर्वीच वेळीच दक्षता घेत आपली सर्व बँक खाती गोठवून घेतले.
परिणामी त्यांच्या खात्यातून 369 रूपये वगळता आणखी पैसे वळते होेणे बंद झाले. फ्लिपकार्ट लाइव्ह सेल चे मााध्यमातून फसणुक झाल्याचा तक्रार अर्ज बजाज यांनी चाळीसगाव शहर पोलीसांना दिला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सध्या बनावट वेबसाईट कंपन्यांचा इंटरनेटवर सुळसुळाट असून त्यात अनेकांची फसवणूक होवून त्यांची बँक खाती रिकामी होत आहेत.अशा ऑनलाईन फसवणुकपासून नागरीकांनी सावध राहावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

Previous articleमुलींच्या लग्नासाठी लवकरच भव्यदिव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा…
Next articleखासदार सांस्कृतिक महोत्सवातून चाळीसगावकरांना केला छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here