Home जळगाव मुलींच्या लग्नासाठी लवकरच भव्यदिव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा…

मुलींच्या लग्नासाठी लवकरच भव्यदिव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा…

17
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_075810.jpg

मुलींच्या लग्नासाठी लवकरच भव्यदिव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा…

दहा हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती, हळदी कुंकू करत वाण भेट देऊन शिवनेरी फाउंडेशन तर्फे महिलांचे स्वागत…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू करण्यात आल्या आहेत. चाळीसगाव मतदारसंघात देखील २०१८ – १९ मध्ये बोटावर मोजता येतील एव्हडे बचत गट होते. आज २०२४ मध्ये ३२०० गटांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात १०० कोटींचे बँक भांडवल उलाढाल झाली आहे.
ही महिलाशक्तीची ताकद असून रुपयाला रुपया जोडत आपला संसार गाढा महिला भगिनी ओढतात. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर त्यांचा घरातील सदस्य म्हणून ज्या बचत गटातील व तालुक्यातील सर्वसामान्य घरातील मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी घेत असून येत्या तीन महिन्यांत भावदिव्य असा मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याची घोषणा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केली.
ते चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे शिवजयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित बचत गट CRP व VO सन्मान शक्तीवंदन अभियान व शिवनेरी फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यानिमित्ताने सुप्रसिद्ध मराठी अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व त्यांची कन्या सह्याद्री यांचा न्यू होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवयानीताई ठाकरे, अभियंता सेल प्रदेशाध्यक्ष
शुभम जयभाये, जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा संगीताताई गवळी, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, शहराध्यक्ष नितीन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस धनंजय मांडोळे, प्राचार्या साधनाताई निकम, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण, मोहिनी ताई गायकवाड, नमो ताई राठोड, सुलभाताई पवार, विजयाताई, चिराग शेख, अमोल नानकर, अमोल चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, मनोज गोसावी, सचिन दायमा, माजी सभापती विजय जाधव, बबलू चव्हाण, बबन पवार, अविनाश नाना चौधरी, लोखंडे ताई, हरीश शिवरकर, सतीश पाटील, गोपाल पाटील, निलेश तेलंगे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, चाळीसगाव तालुक्यात बचत गटांच्या प्रभाग संघांसाठी मेहुणबारे व देवळी येथे प्रभाग संघ इमारत बांधकाम आमदार निधीतून सुरु झालं आहे. पुढील काळात बहाळ – कळमडू, करगाव – टाकळी प्रचा, रांजणगाव पाटणा, वाघळी – पातोंडा, उंबरखेड – सायगाव या प्रभाग संघांना देखील निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठा हळदीकुंकू महोत्सवाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने तालुक्यातील बचत गटांच्या महिलांसाठी विविध बक्षिसे लकी ड्रॉ च्या माध्यमातून देण्यात आली. त्यात प्रथम बक्षिस म्हणून १ ग्रॅम सोन्याच्या ३ नथा, ३ पैठण्या, ३ मिक्सर भाग्यवान विजेत्यांना देण्यात आले. सदर कार्यक्रमाला दहा हजारहून अधिक महिलांनी आपली उपस्थिती दिली.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेते क्रांती नाना मुळेगावकर यांनी न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित महिला माता-भगिनींचे मनोरंजन केले तसेच चांगल्या पद्धतीने सहभागी होणाऱ्या महिलांना बक्षीस देखील दिली जळगाव तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हळदीकुंकू महोत्सव साजरा होत असल्याने महिलांनी देखील या महोत्सवाचा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घेत शिवनेरी फाउंडेशन चे कौतुक केले.
आलेल्या प्रत्येक महिलेला शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आली तसेच प्रत्येक महिलेसाठी अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याने महिलांची कोणत्याही प्रकारची गैरसोय त्या ठिकाणी झाली नाही. या सुंदर अशा नियोजनाबद्दल उपस्थित महिलांनी शिवनेरी फाउंडेशन चे आभार मानले.

Previous articleवैशाली मडावी उर्फ लावण्या( नृत्य कलाकार) यांचा सातलवाडा येथे सत्कार
Next articleबनावट वेबसाईटमुळे चाळीसगावचे इसमाचे बँक खाते रिकामे होण्यापासून वाचले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here