Home नाशिक निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे सोमवार २६ रोजी धर्म ध्वजारोहण सोहळा

निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे सोमवार २६ रोजी धर्म ध्वजारोहण सोहळा

74
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_074625.jpg

निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे सोमवार २६ रोजी धर्म ध्वजारोहण सोहळा

२ एप्रिल ते ९ एप्रिल या काळात अखंड हरिनाम सप्ताह व भव्य दिव्य संगीत गाथा पारायण सोहळा

श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळा प्रित्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन

निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदैव वैकुंठगमन सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पर्यंत सोहळ्याचे आयोजन निफाड तालुक्यातील भरवस फाटा या ठिकाणी होणार असल्याने येत्या सोमवार २६ रोजी धर्म ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती वारकरी भुषण तथा वैकुंठ गमन सोहळा मार्गदर्शक हभप ज्ञानेश्वर माऊली कदम, आळंदी देवाची यांनी दिली आहे.
श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यास यावर्षी ३७५ वर्ष पूर्ण होत आहे. या उत्सवाचे सर्वप्रथम मानाचे श्रीफळ नाशिक जिल्ह्याला मिळाले असून २ ते ९ एप्रिल या शुभ पर्वकाळात निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अखंड हरिनाम सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य असे की एप्रिल महिन्यात होणाऱ्या या धर्म सोहळ्यास श्री जगद्गुरु तुकोबाराय पादुकांच्या रूपाने नासिक जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या द्वारे श्रीक्षेत्र देहू येथून भरवस फाटा येथे प्रथमच आणण्यात येणार आहे. श्री क्षेत्र देहू ते भरवस फाटा येथे ज्ञानज्योत आगमन ३७५ तरुणांच्या हस्ते आणण्यात येणार आहे. या काळात दररोज ५००० वाचकांचा भव्य दिव्य संगीत गाथा पारायण सोहळा संपन्न होणार आहे. भारतातील प्रमुख चार पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
अखंड हरिनाम सप्ताह मध्ये २४ तास तुकाराम नावाचा अखंड भजन पहारा गजर होणार आहे. दररोज ५०० टाळकरी व ५० मृदंग वादक कीर्तन सेवा देणार आहेत. या काळात दररोज ५० हजार भाविकांचे अन्नदान करण्याचे उद्दिष्ट असून गुढीपाडव्याच्या शुभपर्व काळात एक लाख भाविकांना मांड्यांचे भोजन देण्यात येणार आहे.श्री जगद्गुरु तुकोबाराय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन या काळात केले जाणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठगमन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Previous articleनिफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे सोमवार २६ रोजी धर्म ध्वजारोहण सोहळा
Next articleसमाजभूषण डी जी रंगारी यांचा तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here