Home वाशिम आ. लखन मलीक यांच्या विशेष प्रयत्नाने मंगरुळपीरला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजुर

आ. लखन मलीक यांच्या विशेष प्रयत्नाने मंगरुळपीरला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजुर

52
0

आशाताई बच्छाव

IMG_20240223_194843.jpg

आ. लखन मलीक यांच्या विशेष प्रयत्नाने मंगरुळपीरला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजुर
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- वाशिम मंगरुळपीर मतदार संघाचे आमदार लखन मलीक यांच्या विशेष प्रयत्नाने मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयातील खाटांची संख्या ३० वरुन ५० करण्यास मंजुरी मिळाली असून विशेष बाब म्हणून या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन करण्यास मान्यता मिळाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ फेब्रुवारीला निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार या विचाराधीन प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाली आहे. या श्रेणीवर्धन रुग्णालयासाठी विहित पध्दतीने जागा अधिग्रहीत करुन बांधकाम व पदनिर्मिती करण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्याचेही सुचविण्यात आले आहे. मंगरुळपीर तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या पाहता ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन या ठिकाणी खाटांची संख्या वाढविण्यात यावी या मागणीसाठी आ. लखन मलीक यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या उपजिल्हा रुग्णालयामुळे मंगरुळपीर तालुक्याच्या आरोग्य सेवेला व रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विशेष उपलब्धीमुळे आ. लखन मलीक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, अवर सचिव अमोल पाटणकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर यांचे आभार मानले आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा व खाटांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांवर त्वरीत उपचार मिळण्यास मदत होईल असा विश्वास आ. मलीक यांनी व्यक्त केला आहे.

उपजिल्हा रुग्णालय मंजुरीमुळे आरोग्यसेवा सुरळीत
मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयातील खाटांची संख्या तोकडी असल्यामुळे ही संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नाला यश मिळाले असून खाटांची वाढलेली संख्या व श्रेणीवर्धनमुळे तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळून आरोग्यसेवेवरचा ताण कमी होईल तसेच रुग्णांना त्वरीत उपचार मिळू शकेल.
– आ. लखन मलीक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here