Home बुलढाणा शिवसेनेचे हिंदुत्व घरातील चुल पेटवणारे – उध्दव ठाकरेमोताळ्यातील संवाद मेळावा रेकॉर्ड ब्रेक...

शिवसेनेचे हिंदुत्व घरातील चुल पेटवणारे – उध्दव ठाकरेमोताळ्यातील संवाद मेळावा रेकॉर्ड ब्रेक शहराला भगव्या वादळाचे स्वरूप

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240223_075728.jpg

शिवसेनेचे हिंदुत्व घरातील चुल पेटवणारे – उध्दव ठाकरेमोताळ्यातील संवाद मेळावा रेकॉर्ड ब्रेक शहराला भगव्या वादळाचे स्वरूप
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर

 

मोताळा:- शिवसेनेचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे आहे तर भाजपचे हिंदुत्व घर पेटवणारे आहे. आपल्यामध्ये मी कुटुंब संवाद करायला आलो आहे मला शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसतात ते पुसण्याचे काम मी कर्जमाफी करून केली. गद्दारांना 50 खोके देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी त्यांच्या कडे पैसे नाहीत. या सरकारला गुडघ्यावर आणण्याची ताकद शेतकऱ्यां मध्ये आहे. एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला पाय उतार करून गद्धाराना गाडा असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
आजपासून बुलढाणा जिल्हा दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंची दुसरी सभा आज गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी मोताळा येथे पार पडली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. बुलडाणा अर्बन शाखे जवळील मैदानावर पार पडलेल्या या रेकॉड ब्रेक सभेला सेना नेते खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अरविंद सावंत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, युवा सेना सचिव वरुन सरदेसाई, यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत व जिल्हाप्रमुख सुनील घाटे यांच्यासह पक्षातील मान्यवर मंडळी शिवसैनिक बहुसंख्येने हजर होते. यावेळी ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील सरकार ला लक्ष्य केले.
मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं परंतु अमित शहा आणि मोदी यांनी दिलेला शब्द मोडला म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन यांचे मी दात पाडले. गद्दाराना बेंडूक पेक्षा आणखी काही म्हणा येणाऱ्या निवडणुकीत जनता जनार्दन त्यांना त्यांची जागा दाखविणार असुन पुढचे शंभर वर्ष भारतीय जनता पार्टी कोठेही सत्तेत येणार नसल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मोताळा तालुक्यात पहिल्यांदाच झालेल्या या रेकॉर्ड ब्रेक जनसंवाद मेळाव्याचे सूत्रसंचालन बुलडाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाप्रमुख जालीधर बुधवत यांनी केले.
—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here