Home भंडारा अड्याळ येथे संविधान रॅलीचे स्वागत

अड्याळ येथे संविधान रॅलीचे स्वागत

18
0

आशाताई बच्छाव

IMG_20240221_084506.jpg

अड्याळ येथे संविधान रॅलीचे स्वागत

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या नेतृत्वात, ईव्हीएम हटाव देश बचाव, संविधान बचाव, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, एससी ओबीसी एनटी,व्ही जेयेटी ,एसबीसी, यांना आरक्षण द्या. महागाई निर्देशांकानुसार शेतमालाला हमीभाव द्या. जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण रद्द करा. नोकऱ्यांचे कंत्राटीकरण रद्द करा. इत्यादी मागण्यांना घेऊन खरबी येथून संविधान जनजागृती रॅली ची सुरुवात करण्यात आली.
सदर रॅली खरबी येथून सुरुवात होऊन पेट्रोल पंप, शहापूर, फुल मोगरा, बेला, भंडारा शिवाजी चौक, गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, अंबाडी सिल्ली मानेगाव गडाला व बोरगाव इत्यादी गावात जाहीर सभा घेण्यात आल्या. बोरगाव येथे बुद्ध विहारात संविधान जनजागरण रॅलीच्या कार्यकर्त्यांना भोजनदान देण्यात आले .आज दिनांक 20 फरवरी 2024 ला अड्याळ येथे सामाजिक कार्यकर्ते वैशाली बुद्धविहाराचे अध्यक्ष मुनेश्वर बोदलकर माजी सरपंच व त्यांच्या चमूने संविधान रॅलीचे स्वागत केले .
सदर रॅलीच्या नेतृत्व जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर, मुख्य संयोजक सदानंद ईलमे, निमंत्रक भैय्याजी लांबट कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे, अचल मेश्राम, महासचिव शशिकांत भोयेर, डॉ.
बाळकृष्ण सार्व, भाऊराव सार्व, कुंदा लुटे, आदिवासी नेते अजाबराव चिचामे, सुरेश खंगार ,इंजिनिअर रूपचंद रामटेके दिलीप ढगे, ज्ञानचंद जांभुळकर, रोशन उरकुडे, वामनराव गोंधळे, संजीव भांबोरे, सदानंद धारगावे, चंद्रशेखर खोब्रागडे, श्रीराम बोरकर, संजय लांजेवार ,मोरेश्वर तिजारे, मनोज देशमुख, मंजू गजभिये, गीतांजली घरडे, कुंदा उके, साहिल हुमणे ,रमेश शहरे, सूर्यकांत हूमने, व बहुसंख्य कार्यकर्ते रॅली सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे अड्याळ येथे संविधान रॅली यशस्वी करण्याकरता विपिन टेंभुर्णे ग्रामपंचायत सदस्य, आशिक अंबादे ग्रामपंचायत सदस्य, राजू लाडे ,चिंटूभाऊ अंबादे, प्रेमसागर गजभिये माजी ग्रामपंचायत सदस्य चकारा,साधनाताई कासारे ,कल्पनाताई जांभुळकर दिनेश्वरी वानखेडे जिजाबाई चौधरी ,मीनाताई सहारे ,रवी साखरे ,नंदलाल मेश्राम, नलुबाई कराडे, डॉ गणेश मेश्राम, अमोल थूलकर ,राजेश कराडे, बंडू खोब्रागडे ,विकास टेंभुर्णे यांनी व गावातील नागरिकांनी सहकार्य केले.

Previous articleनिमगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा कार्यकारणी कठीण
Next articleस्वराज्य पोलिस मित्र संघटना पालघर जिल्ह्यात ओळखपत्र वितरण आणि हळदी कुंकू समारंभ उत्साहाने साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here