Home उतर महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित –विनोदजी राक्षे.

समाजभूषण पुरस्काराने सन्मानित –विनोदजी राक्षे.

138
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_064300.jpg

समाजभूषण पुरस्काराने सन्मानित –विनोदजी राक्षे.
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास परिषदेच्या माध्यमातून समाजभूषण पुरस्काराचे वितरण श्रीरामपूर येथील लोयोला दिव्यवाणी नाॅर्दन ब्रॅच या ठिकाणी करण्यात आले. सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मूहर्तावर समाजकार्य करणारे, माजी शिक्षण समितीचे सभापती,कोपरगावचे माजी नगरसेवक विनोदजी राक्षे यांना समाजभूषण पुरस्कार २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून श्री.विनोदजी राक्षे यांना ट्रॉफी,शाल, श्रीफळ व बुके देऊन रे.फा.अनिल चक्रनारायण, नगरसेवक दिपक चव्हाण, दिपक कदम,पा.राजेश कर्डक,पा.आण्णा अमोलिक,पा.प्रविण शिंदे यांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी विनोद राक्षे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी अनेक दिव्यागं अधं कूटूबियांना केलेली मदतीची माहिती दिली.समाजात काही कूटूंब स्वाताकडे काही नसतानाही जनतेच्या दिलेल्या मदतीवर त्यांनी त्यातून मदत केलेची उदाहरणे दिली.एवढेच नव्हे तर अंध कूटूबियांना घराचे पत्रे फक्त ३ दिवसांत मिळून दिलेले त्यांनी आपल्याकडील व्हिडिओ द्वारे दाखवून दिले. तसेच प्रकाश निकाळे सर यांना महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेने केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला.तर संतोष कोळगे टेलर मामा खबरदार या कविता सादर करून शिवाजी महाराजांचा इतिहासातून आपले प्रकट केले.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले,रे.फा.अनिल चक्रनारायण,प्रताप देवरे, पा.राजेश कर्डक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रप्रमुख उत्तम शेलार सर, ख्रिस्ती समाजाचा बुलंद आवाज,नॅशनल कौन्सिलचे प्रविणराजे शिंदे,अविनाश काळे, अजितकुमार सुडगे, राजू साळवे, प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे,विशाल पंडीत ,पा.दिपक शेळके,प्रमोद संसारे, नितीन जाधव, संतोष गायकवाड, निशिकांत पंडीत, विलास पठारे, राजू भोसले, मुख्याध्यापक उबाळे सर,श्रीमती वर्षा साळवे, सुनिल संसारे, चंद्रकांत येवले, डॉ.संजय दुशिंग, अशोक बार्शी , संजय साळवे सर, संतोष कोळगे मामा इ.अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी अध्यक्षांची निवड निशिकांत पंडीत यांनी केली तर प्रा.भाऊसाहेब तोरणे यांनी सुत्र संचालन केले तर आभार जिल्हाध्यक्ष दिपक कदम यांनी मांडले.

Previous articleमालेगांवी जय शिवराय ग्रुपचा आगळा वेगळा उपक्रम श्री शिव जन्मोत्सव निमित्त शिव चरित्र वाटण्याचा निर्धार
Next articleमहांकाळ वाडगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here