Home उतर महाराष्ट्र १९७२ च्या दुष्काळात संस्थेची सुरुवात सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्तींना आधार दिल्याने आज...

१९७२ च्या दुष्काळात संस्थेची सुरुवात सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्तींना आधार दिल्याने आज संस्थेची वेगाने घोडदौड – पद्मश्री पोपटराव पवार.

73
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_202100.jpg

१९७२ च्या दुष्काळात संस्थेची सुरुवात सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्तींना आधार दिल्याने आज संस्थेची वेगाने घोडदौड – पद्मश्री पोपटराव पवार. अहमदनगर (प्रतिनिधी दिपक कदम)- हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची सहकारी पतपेढी लिमिटेड अहमदनगरच्या वास्तू नूतनीकरण व सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, पतसंस्थेमध्ये सभासद हिताला कसे प्राधान्य असावे व संस्था कशामुळे मोठ्या होतात मोठ्या झालेल्या संस्था मुळे सभासदाचा भविष्यकाळ किती उज्वल होवू शकतो हे या सुवर्ण महोत्सवातून दिसते. तसेच महाराष्ट्रात शैक्षणिक आर्थिक असे सगळे बदल झालेले असल्याची चर्चा असते व दुसरीकडे चैनल वर ब्रेकिंग न्यूज असते की झालेला घोटाळा? मात्र जबाबदारी कोणाची आहे. संस्था कशा टिकल्या पाहिजे याचे उत्तम उदाहरण दिले व ज्या सभासदांनी 72 च्या दुष्काळात या संस्थेची सुरुवात केली व सर्वसामान्य ग्रामीण भागातील सभासदांना आधार दिला आज ती संस्था अतिशय वेगाने आपली सुवर्ण महोत्सवी घोडदौड करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची सहकारी पतपेढीचा सुवर्णमहोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .वास्तू नूतनीकरणाच्या कोनशिलेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अँड. अनंतराव फडणीस, अजित बोरा,, डॉ.पारस कोठारी ,रणजित श्रीगोड, ज्योतीताई कुलकर्णी ,संस्थापक संचालक ,सुरेश भाटे ,सुधाकर कुलकर्णी , हणमंत सिद्धापूर, चंद्रकांत जोशी, मधुकर कुलकर्णी, सुरेश शिंदे, सुजाता मालपाठक, अुषा घुमरे, पतपेढीचे माजी सर्व पदाधिकारी ,हिंद सेवा मंडळाच्या पतपेढीचे अध्यक्ष अधिक जोशी, उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे, खजिनदार सुभाष येवले, सर्वश्री संचालक महेश डावरे, अमोल कदम, दीपक आरडे, सतीश म्हसे, नितीन केणे, राहुल गागरे, बाळासाहेब भोत सतीश फरताडे, मधुकर पवार, दीपक शिरसाट, स्मिता पुजारी, वैशाली दारवेकर, रावसाहेब नवले, रामकृष्ण कुलकर्णी, सेक्रेटरी किशोर कुलकर्णी, ज्ञानेश भागवत , सौरभ ठाणगे, राहुल साठे आदीसह पतपेढीचे माजी पदाधिकारी सर्व सभासद व सेवानिवृत्त अ. वर्ग सभासद, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हिंद सेवा मंडळाच्या वास्तू नूतनीकरण व सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते पतपेढीच्या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच पतपेढीचे मोबाईल अँपचे उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पतपेढीचे अध्यक्ष अधिक जोशी यांनी वास्तू नूतनीकरण व सुवर्ण महोत्सव सोहळ्या निमित्त पतपेढी विषयी माहिती सांगितली व अनेक मान्यवरांनी हिंद सेवा मंडळाच्या पतपेढी विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात सर्वश्री संस्थेचे मानद सचिव संजय जोशी, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजी कर्डिले, अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी मनोगत व्यक्त करून पतपेढीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी वास्तू नूतनीकरण व सुवर्ण महोत्सवास शुभसंदेशातून आपल्या शुभेच्छा दिल्या तत्पूर्वी पहिल्या सत्रात पतपेढीचे संस्थापक संचालक व माजी पदाधिकारी यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सेवानिवृत्त सभासद यांचा तिळगुळ समारंभ ब स्नेहमेळावा. कार्यक्रम घेण्यात आला त्यात सभासदांनी पतपेढीची आजपर्यंतची वाटचाल कशी झाली. हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व संस्थापक संचालकांच्या हस्ते सर्व सभासदांना तिळगुळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. सतीश म्हसे व बबन धनवडे यांनी केले. उपस्थित सर्व सभासदांना २५ ग्रॅम चांदीचे नाणे देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ व आदिनाथ जोशी यांनी केले तर आभार नितीन केणे यांनी मानले…………

Previous articleउद्धव ठाकरे यांना ‘खंबीर योद्धा’ पुरस्कार
Next articleमहिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्यात 98 महिला उमेदवारांची अंतिम निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here