Home भंडारा स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे व्यासपीठ : पंकज वानखेडे

स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे व्यासपीठ : पंकज वानखेडे

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_213502.jpg

स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे व्यासपीठ : पंकज वानखेडे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे व्यासपीठ आहे, असे मत पंकज वानखेडे यांनी केले. ते इंडीयन स्टार इंटरनॅशनल स्कूल आंबाडी येथे २०२३-२४ स्नेहसंमेलनाप्रसंगी मुख्य प्रमुख अतिथी स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला अध्यक्ष पदी कामगार अधिकारी पराग शंभरकर , मुख्य अतिथी विधी अधिकारी राहुल खंदारे , सामाजिक कार्यकर्ते शेखर बोरकर , सरपंच ग्रामपंचायत आंबाडी , सदस्य पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक व कर्मचारी ,
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उपस्थित होते. दरम्यान स्नेहसंमेलनात
पहिल्या सत्रात विज्ञान प्रदर्शन व कला, हस्तकला प्रदर्शन घेण्यात आले होते. त्यात चिमुकल्यांनी तयार केलेल्या वस्तू पाहण्यासारख्या होत्या. वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात नृत्याने झाली. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

Previous articleसंग्रामपूरचे कर्तव्यदक्ष तहसिलदार टोम्पे यांची बदली रद्द करावी ! स्वस्तधान्य दुकाणदार संघटना, संग्रामपूर यांची मागणी
Next articleतुमसर येथे मातोश्री माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here