आशाताई बच्छाव
सुंदरता हा कलेचा आत्मा —
कला मधील कल हा मुळ संस्कृत शब्द आहे. कल याचा अर्थ प्रकट करणे, आवाज करणे, एखाद्या पूर्ण भागातील काही अंश अविष्कारीत करणे इत्यादी. खुप गोगाट झाला की आपण म्हणतो काय कलकल चालली आहे.
पूर्ण चंद्राच्या वाढत जाणा−या अविष्काराला चंद्रकला म्हणतात जसा चंद्र कला कला ने वाढतो त्याच प्रमाणे एखादे चित्र प्रथम बिंदु, रेषा, आकार, रंग, पोत याचा हळूहळू वापर होवून यथा आवकाश पूर्ण होते. तसे शास्त्रीय संगीतातील एखादा रागामध्ये हळूहळू आलाप, तान, बंदिश इत्यादी. अविष्काराने रागाचे स्वरुप उलघडताना दिसते.ही कला एक जादुगारीण आहे. तिचा स्पर्श वस्तुला, विचाराना अगर भावनाना झाला की त्यांना चिरंतन रुप प्राप्त होते. मनुष्यांच्या मनात आनेक भावना थैमान घालत असतात. या भावना उत्कट झाल्या म्हणजे त्यांना प्रत्यक्षरुप देणे भाग असते. मग या भावना प्रत्येकाच्या आवडीनुसार मुर्तस्वरुपात येतात. कोण चित्र, शिल्प, गायण, वादन, कथा, कविता, नृत्य, अभिनय यातून मुर्त स्वरूपात आणतात.हे मुर्त स्वरूप आणताना त्याला कौशल्य दिले की ती कला होते. कौशल्य कशासाठी, तर सुंदरता हा कलेचा आत्मा आहे आणि सुंदरता आणण्यासाठी कौशल्य आवश्यक असते.
कलेचा संबंध माणसाच्या आचार, विचार, भावना, व निसर्गातील घटकांशी असतो. म्हणून कलेबद्दलचे अनेक वेगवेगळे विचार आहेत.कला ही मानवाला बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था या तिन्ही अवस्थेत मानवास साथ देते.
कला शिक्षक – आनंदा आहिरे
छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय वनसगाव