Home भंडारा नरेंद्र गुळघाने यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्काराने हिंगणा येथे सन्मानित

नरेंद्र गुळघाने यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्काराने हिंगणा येथे सन्मानित

46
0

आशाताई बच्छाव

IMG_20240202_083846.jpg

नरेंद्र गुळघाने यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्काराने हिंगणा येथे सन्मानित

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )
संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा अखिल भारतीय कर्मयोगी संत गाडगेबाबा साहित्य व कला मंच च्या वतीने प्रथम वर्धापन दिन व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेणा नदीच्या तीरावर असलेल्या विश्वशांती वेणावन शांती विहार हिंगणा येथे २०२४ चा राज्यस्तरीय” महाराष्ट्र काव्यभूषण पुरस्कार “कारंजा तहसील कारंजा जिल्हा वर्धा हल्ली मुक्काम तळेगाव तालुका आष्टी जिल्हा वर्धा येथील रहिवासी प्रथितयश कवी साहित्यिक नरेंद्र साहेबरावजी गुळघाने यांना हा मानाचा पुरस्कार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे भंडारा ,राष्ट्रीय युवा प्रबोधनकार सतीश सोमकुवर नागपूर ,माणिकराव खोब्रागडे आंबेडकरवादी विचारवंत नागपूर ,गझलकार प्रा. सुजाता मेश्राम मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल ,पुष्पगुच्छ ,सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. नरेंद्र गुळघाने यांचे शिक्षण एम ए (एम एल टी )आणि डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर असून ते सध्या ग्रामसेवक पदावर आष्टी येथे कार्यरत आहेत. त्यांना काव्य लेखन, ललित लेखन, अभंग, चारोळी आध्यात्मिक लेख ,वैचारिक लेखन, गीत, लेखन ,पोवाडे, लावणी भारुड लेखनाचा छंद आहे .त्यांचे निसर्ग ,प्रेम, अध्यात्मिक, सामाजिक, वैचारिकआदिवासी,विद्रोही,आंबेडकरी या सर्व विषयावर ३५५२ कविता लेखन ,अभंग लेखन ५५० अभंग तसेच सामाजिक ,आध्यात्मिक ,व्यक्ती वर्णन २५३ लेख , रवी सूर्य भास्कर वर १८३ कविता लेखन, पारिजात फुललेला १५७ लेख इत्यादी साहित्य रचना अनेक मासिक दैनिक,त्रैमासिक ,दिवाळी विशेषांक यामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत .त्याचप्रमाणे फूटपाट, रविकिरण ,आणि इतर ९ काव्य संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. पारिजात फुललेला ,सामाजिक ,दलित, आंबेडकरी ,आदिवासी ,प्रेम, निसर्ग ,काव्य लेखन या साहित्याचे लेखनात ते अग्रेसर आहे ” शर्यत रे अपुली ” विशुभाऊ बापट यांचे प्रसारित काव्य भागात कवी म्हणून सहभागी झाले असून त्याचे एकूण १८ भाग सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेले आहे, परीक्षक, गीतकार, संगीतकार ,यशवंत देव सर ,साहित्यिक प्राध्यापक नंदा केशव मेश्राम ,प्राध्यापक कविवर्य विठ्ठल वाघ, पकविवर्य प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर सर यांचा सहभाग होता. राष्ट्रपती यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार २ वेळा, वॉटर कप पुरस्कार आमिर खान आणि मुख्यमंत्री यांचे हस्ते दोन वेळा, सुरेश भट गजल पुरस्कार ..सुरेश भट गजर प्रतिष्ठान अमरावती कडून, महाराष्ट्र राज्य साहित्य काव्य कला शिरोमणी पुरस्कार महाराष्ट्र राज्य निनाद साहित्य अकादमी मुख्यालय आष्टी यांचे कडून अशा अनेकविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे भाषा साहित्य काव्य पुरस्कार मिळाला .त्यांस मिळाला आहे. अशा अनेकविध संस्था आणि समूह कडून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले, आज पर्यंत त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (पुणे) वर्धा जिल्हा , कोषाध्यक्ष..भारत बहुउद्देशिय शिक्षण संस्था तळेगाव , सचिव कारंजा तालुका, महानुभाव मंडळ कारंजा ,सरचिटणीस महाराष्ट्र राज्य निनाद साहित्य कला अकादमी मुंबई, माजी अध्यक्ष मराठी साहित्य मंडळ मुंबई (वर्धा जिल्हा ) अशी अनेक पदे आजपर्यंत त्यांनी भूषविलेले आहेत.हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्याचे अनेक साहित्य संस्था,आणि त्यांचे पदाधिकारी यांनी आणि अनेक नामवंत साहित्यिक मित्र यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे .

Previous articleनातेसंबंध
Next articleआदिवासी भागातील कुपोषण आणखी कमी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग घ्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here