Home नाशिक के. के. वाघ महाविद्यालय चांदोरीचे ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबिर–

के. के. वाघ महाविद्यालय चांदोरीचे ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबिर–

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_183142.jpg

के. के. वाघ महाविद्यालय चांदोरीचे ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबिर–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आझादीचा अमृत महोत्सव अंतर्गत युवकांचा ध्यास ग्राम-शहर अंतर्गत “लोकसंख्या नियंत्रण जनजागृती” चाटोरी ता. निफाड येथे शुक्रवार दि. १९/०१/२४ रोजी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन चाटोरीच्या तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री. रघुनाथ हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना श्री हिरे म्हणाले कि, राष्ट्रीय सेवा योजना हे तरुणांसाठी एक उत्तम व्यासपीठ असून यातून उद्याचे उज्ज्वल राष्ट्र घडण्यासाठी निश्चित हातभार लागणार आहे. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असणारे श्रमाचे संस्कार हे उस्फुर्तपणे बाहेर पडतात म्हणून या पडझडीच्या काळात अशी शिबिरे होणे आवश्यक आहे.
त्यानंतर आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर म्हणाले कि, दत्तक गाव चाटोरी येथे या शिबिराच्या माध्यमातून आमचे स्वयंसेवक ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन यांसारखे उपक्रम राबवतील.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर, उपप्राचार्या डॉ. एस. जी. सावंत, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण आहेर, प्रा. राहुल पोटे, प्रा. दिपाली खैरनार, प्रा. सुवर्णा सुरवाडे, चाटोरी सोसायटीचे चेअरमन श्री सदाशिव खेलूकर, सरपंच सौ. अरुणा हांडगे, उपसरपंच श्री बाळासाहेब हिरे, पोलीस पाटील श्री सचिन हांडगे, श्री दिलीप कदम, श्री नारायण वरखेडे, श्री दिपक पाटील, श्री राहुल गायकवाड, श्री गणेश वाणी, श्री राजेंद्र खेलूकर, श्री गणेश खेलूकर, श्री संतोष हिरे, श्री राजेन्द्र कटारे, श्री प्रकाश हिरे, श्री संतोष शिरसाठ यांसह चाटोरी येथील ग्रामपंचायत, सोसायटी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री रघुनाथ हिरे, श्री सदाशिव खेलूकर, श्री दिलीप कदम, श्री राहुल गायकवाड, श्री गणेश वाणी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी प्रास्ताविक केले तर कु. अंजली पेखळे हिने सूत्रसंचालन तर कु. माहेश्वरी हिंगमिरे हिने आभार मानले. सदर शिबीर उद्घाटनासाठी कार्यक्रम अधिकारी, ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते.

Previous articleकानळद जि प शाळेच्या समीक्षा जाधव ची धावणे प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
Next articleजिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतही आता नवीन होणार!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here