आशाताई बच्छाव
😱 मोठी बातमी : पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर; राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता!!
मनमाड,(प्रतिनिधी सुनील गांगुर्डे)
💁♂️ नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल टँकर चालक संपावर गेले आहेत. मध्यरात्री १२ वाजेपासून टँकर चालकांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून टँकर चालकांनी ‘स्टिअरिंग छोडो’ आंदोलनाची घोषणा करत संपाची घोषणा केली आहे.
⛽ त्यामुळे मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार असल्याची शक्यता आहेत. तसेच राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व खांदेशचा इंधन पुरवठा ठप्प होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची जबाबदारी घेण्यासाठी कोणेही तयार नसल्याचे देखील बोलले जात आहे.
🚫 गेल्या आठवड्यात ट्रक चालक आणि पेट्रोल-डिझेल टँकर चालक यांनी संपाची हक दिली होती. नवीन वाहन कायद्याला विरोध करत ट्रक चालक संपत सहभागी झाले होते.
ℹ️ मात्र, सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला होता. परंतु, आता पुन्हा एकदा आजपासून ट्रक चालक आणि पेट्रोल-डिझेल टँकर चालक यांनी संपाची हाक दिली आहे.
📍 दरम्यान, पेट्रोल-डिझेल टँकर चालक यांचा आजच्या संपामुळे राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल-डीझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
➖➖➖➖➖➖➖