Home नांदेड विभगीय क्रीडा स्पर्धा देगलूर महाविद्यालयात संपन्न..

विभगीय क्रीडा स्पर्धा देगलूर महाविद्यालयात संपन्न..

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20240107_095945.jpg

विभगीय क्रीडा स्पर्धा देगलूर महाविद्यालयात संपन्न..

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

(देगलूर) :स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि देगलूर महाविद्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय अंतर महाविद्यालयीन बाँल बँडमिटन स्पर्धा(मुले/मुली )आयोजित करण्यात आलेले होते.देगलूर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत मुले प्रथम क्रमांक बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत द्वितीय क्रमांक देगलूर महाविद्यालय देगलूर तृतीय क्रमांक महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर तर
मुली मध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा द्वितीय क्रमांक देगलूर महाविद्यालय देगलूर तृतीय क्रमांक वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर संघानी विजय प्राप्त केला .या स्पर्धेचे अतिशय योग्य नियोजन प्रा.डॉ निरज उपलंचवार,प्रा.डॉ दिलीप भडके,प्रा.दिपक वावधाने.प्रा सिताराम हके यांनी केले होते.
स्पर्धेचे उद्घाटन अ.व्या.शि.संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील बेंबरेकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ यांनी खेळाडूसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या.यावेळी उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार ,क.म.वि उपप्राचार्य उत्तमकुमार कांबळे,पर्यवेक्षक प्रा.संग्राम पाटील यांची उपस्थिती होती. स्पर्धेत पंच म्हणून प्रा.मुबीन अब्दुल, प्रा फैयाज,प्रा.शेख नूर,प्रा.विजय कुदळे, श्री मधुकर कांबळे आणि श्री संतोष द्याडे यांनी काम पाहिले.
तर यावेळी संयोजक डॉ निरज उपलंचवार, प्रा दीपक वावधाने, प्रा डॉ संतोष येरावार,डॉ भानुदास नरवाडे, डॉ संजय देबडे,प्रा शिवचरण गुरुडे,प्रा बाळासाहेब नागरगोजे,प्रा तुकाराम लागले,प्रा लक्ष्मीकांत मल्लूरवार,आणि क्रिडाशिक्षक प्रा सीताराम हके यांनी परिश्रम घेतले तसेच सूत्र संचालन प्रा.शिवचरण गुरूडे व आभार डॉ निरज उपलंचवार यांची केले आहे.

Previous articleलोकनेते कै.मष्णाजीराव निलमवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त देगलूर नगरपरिषद तर्फे अभिवादन करण्यात आले.
Next articleमोठी बातमी : पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर; राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here