Home नांदेड जिद्द चिकाटी अनं मेहनत या त्रिसूत्रीचा आवलंब करून पेनुरच्या ज्ञानेश्वर गवते यांनी...

जिद्द चिकाटी अनं मेहनत या त्रिसूत्रीचा आवलंब करून पेनुरच्या ज्ञानेश्वर गवते यांनी फुलवला शेती मळा

75
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_120113.jpg

जिद्द चिकाटी अनं मेहनत या त्रिसूत्रीचा आवलंब करून पेनुरच्या ज्ञानेश्वर गवते यांनी फुलवला शेती मळा

लोहा प्रतिनिधी,
अंबादास पाटिल पवार

गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात प्रामुख्याने गहू, हरबरा, तूर आणि कापूस या व अन्य पिकांना पाऊस व त्यानंतर धुके आणि ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागला. यामध्ये सर्वाधिक नुकसान हरबरा आणि तूर पिकास झाले. अनेक शेतकर्यांना हरबरा मोडून दुबार पेरणी करावी लागली. तूर पीक फुलोरा अवस्थेत असताना झालेल्या अवकाळी मुळे फुलगळ होऊन, शिल्लक राहिलेल्या पिकात दशकातील सर्वाधिक किड रोगाने नष्ट केले. पण सध्या मात्र मागच्या काही दिवसापासून कोरड्या आणि निरभ्र हवामानामुळे शिल्लक राहीलेली आणि दुबार पेरणी केलेली पीके पुन्हा जोम धरत असल्याचे पेनूर येथील प्रयोग आणि प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर गवते यांनी आमच्या वार्ताहर शी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या शेतात एकात्मिक किड व्यवस्थापनाच्या माध्यमातून विपरीत परिस्थितीत सुद्धा आपली पिके सुरक्षित ठेवली आहेत. मागच्या हंगामात त्यांनी सोयाबीन मध्ये विभाग स्तरित तर हरबरा पिकात तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. पेनूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर गवते हे, शेतीत विपरीत परिस्थितीत यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत अनं आत्मविश्वास या त्रिसूत्री वर काम करत तालुक्यातील नवतरुण शेतकरी यांच्या साठी प्रेरणादायी ठरले आहेत. हे त्यांच्या शेती कसण्याच्या अधुनिक पध्दतीतून स्पष्ट होते आहे त्यांनी फुलवलेल्या शेतीतून सोयबिनचे भरघोष उत्पादन घेतले आहे, शेती परवडत नाही असे वोरड करणारे अनं शेतीतून भरघोष उत्पादन घेणारे शेतकरी ज्ञानेश्वर गवते यांचा आदर्श घेऊन शेती केली तर शेतकरी शेती व्यवसायात यशस्वी होऊ शकतो हे निश्चित खरे !

Previous articleअंगणवाडी कर्मचारी संघटनेला युवक काँग्रेसचा पाठिंबा
Next articleमध्यप्रदेशचे माजी मंत्री राजमनी पटेल यांची शनिदेव शिंगणापूरला भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here