Home अमरावती आदिवासी कोळी महादेव जमातीच्या अन्नत्याग आमरण उपोषणाचा आजचा चौथ्या दिवस

आदिवासी कोळी महादेव जमातीच्या अन्नत्याग आमरण उपोषणाचा आजचा चौथ्या दिवस

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20231210_081446.jpg

आदिवासी कोळी महादेव जमातीच्या अन्नत्याग आमरण उपोषणाचा आजचा चौथ्या दिवस

अद्याप पर्यंत शासन प्रशासन चे दुर्लक्ष

प्रतिनिधी धनराज खर्चान

अमरावती –: विभागीय आयुक्त कार्यालय समोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ वराड अकोला ओ बेरार आदिवासी होळी महादेव सेवा संस्था कावसा यांच्याद्वारे अन्नत्याग आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस ६ डिसेंबर पासून सुरू झालेल्या या अन्नत्याग आमरण उपोषणाला राजेंद्र उर्फ बाबा जुवार व गजानन चुनकीकर हे दोन उपोषण करते बसले आहेत हे दोन उपोषण कर्ते बसले आहेत अजून पर्यंत या उपोषणाची दखल शासनाकडून घेतली नसून आज या उपोषणाचा चौथ्या दिवस आहे. या अन्नत्याग आमरण उपोषणाला अनेक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे
आदीवासी कोळी महादेव जमातीच्या विविध मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपोषण कर्ते व आदोलकांनी केले.
आदिवासी कोळी महादेव जमातीच्या प्रमुख मागण्या -:
१) जाती आणि जमाती सुधारणा कायदा (१०८),१९७६ चा कायदा करण्यासाठी वापरलेले १९५० पूर्वीचे पुरावे विचारात घेवून अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीच्या लोकांना प्रमाणपत्र येथील संबंधित उपविभागीय अधिकारी मार्फत पुण्यात यावे
२) जाती जाती आणि जमाती सुधारणा कायदा १०८/ १९७६ चा कायदा करण्यासाठी वापरलेले १९५० पूर्वीचे पुरावे विचारात घेवून अनुसूचित जमाती पडताळणी समिती अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीला वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.
३) जात प्रमाणपत्र देण्याचे अधिनियम २००३ अन्वये नियम ३( ख) करिता जाती आणि जमाती आर्वा रसेल लिखित मानव वंश शास्त्रज्ञ यांचे पान क्रमांक
५३२ ते ५३५ पर्यंत केलेल्या विस्तृत वर्णात्मक पुरावा विचारात घ्यावा.
४) अधिनियम २००३ अन्वये ४(१) करिता मागितलेल्या वास्तव्याचा पुरावा करिता १९५० पूर्वीची कोळी नोंद असलेल्या कोतवाल बुक नक्कल वास्तव्याचा पुरावा म्हणून वापरावा
अशा विविध मागण्या करिता आदिवासी आदिवासी कोळी महादेव जमातीचे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे.

Previous articleविकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त प्रधानमंत्र्यांचा जनतेशी संवाद
Next articleराष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धेत कु, अनुश्री राजपूत हिने पटकाविले दोन गोल्ड मेडल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here