Home गडचिरोली २५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात १ कोटी रू. किंमतीची विकासकामे मंजूर....

२५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात १ कोटी रू. किंमतीची विकासकामे मंजूर. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.

35
0

राजेंद्र पाटील राऊत

२५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात १ कोटी रू. किंमतीची विकासकामे मंजूर.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोठारी, ऊर्जानगर आणि लखमापूर या परिसरात १ कोटी रू. किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी मिळाली आहे.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्‍या दिनांक ३१ मार्च २०२२ च्‍या शासन निर्णयान्‍वये २५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत सदर १ कोटी रू. किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी देण्‍यात आली आहे. यात प्रामुख्‍याने चंद्रपूर तालुक्‍यातील लखमापूर येथील श्री हनुमान परिसराला संरक्षण भिंतीचे बांधकाम व सौंदर्यीकरण करण्‍यासाठी ६० लक्ष रू., बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोठारी येथील माजी मालगुजारी तलावाचे सौंदर्यीकरण करून बागेची निर्मीती करण्‍यासाठी २० लक्ष रू, आणि ऊर्जानगर प्रभाग क्र. १ मधील केसरीनंदन हनुमान मंदिराच्‍या मागील ओपनस्‍पेसमध्‍ये संरक्षण भिंतीचे बांधकाम व सौंदर्यीकरण करण्‍यासाठी २० लक्ष रू. असा एकूण १ कोटी रू. निधी सदर विकासकामांसाठी मंजूर करण्‍यात आला आहे.

या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने २५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत अनेक विकासकामे बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात मंजूर करण्‍यात आली आहे. या शिवाय खनिज विकास प्रतिष्‍ठान अंतर्गत प्राप्‍त निधीतुन सुमारे १५ ते २० कोटी रू. किंमतीची कामे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात मंजूर करविली आहेत.

Previous articleजिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात भोंगा वाजवून महागाई जुमला आंदोलन
Next articleअहेरी आलापल्ली येथील शासकिय मुलांचे वसतीगृह सुरू करा।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here