Home भंडारा अशोक मोहरकर कॉलेज समोरील अड्याळ येथील ट्रक दुर्घटनेत नवरगाव येथील समीर शेलोटे...

अशोक मोहरकर कॉलेज समोरील अड्याळ येथील ट्रक दुर्घटनेत नवरगाव येथील समीर शेलोटे यांचा जागीच मृत्यू तर आकाश गणवीर गंभीर जखमी

296
0

आशाताई बच्छाव

IMG_20231208_193631.jpg

अशोक मोहरकर कॉलेज समोरील अड्याळ येथील ट्रक दुर्घटनेत नवरगाव येथील समीर शेलोटे यांचा जागीच मृत्यू तर आकाश गणवीर गंभीर जखमी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत अशोक मोरकर कॉलेज येथे दिनांक ७ डिसेंबर 2023 ला रात्री नऊ वाजेच्या दरम्यान मृतक समीर रामू सेलोटे वय 21 राहणार नवरगाव त्याचप्रमाणे जखमी आकाश नाशिक गणवीर वय 21 राहणार नवरगाव येथील रहवासी असून घटनेच्या दिवशी व ठिकाणी मोहरकर कॉलेज समोर ट्रक क्रमांक एम एच 40 बी एल -81 67 चालकाने त्याचा ट्रक रोडच्या मधोमध नादुरुस्त होऊन उभा असताना सदर ट्रकला इतर वाहन धडकून अपघात होऊ नये याकरिता त्या ट्रकचे कोणतेही पार्किंग लाईट किंवा इंडिकेटर सुरू ठेवले नाही तसेच ट्रक बंद असल्याबाबत कोणतेही लाल कपडा लावून सूचनाफलक किंवा आवश्यक कोणतेही उपायोजना न करता सार्वजनिक रस्त्यावर बराच वेळ धोकादायकरित्या रस्त्याच्या मधोमध उभा करून ठेवल्यामुळे फिर्यादीच्या भाऊ समीर शेलोटे व त्याचा मित्र आकाश गणवीर हे दोघे मोटार सायकल क्रमांक एम एच ३६ एजे -83 99 कडूलिवरून नवरगाव कडे जात असताना त्यांना वरील नमूद रस्त्याच्या मधोमध ट्रक उभा असल्याचे अंदाज न आल्याने त्यांच्या ताब्यातील मोटर सायकल सह वरील नमूद ट्रकला मागवून धडकल्याने अपघात होऊन मोटरसायकल चालक समीर शेलोटे यांचा मृत्यू झाला व आकाश गणवीर हा गंभीर दुखापत होऊन जखमी झाला असे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट व डॉ. रिपोर्टिंग वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला आहे .अपराध क्रमांक 264 /2023 कलम 283 ,337, 304 अ भादवी फिर्यादी अनिल रामू शेलोटे वय 23 राहणार नवगाव यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे .दाखल मपोना ढोके/ 1005 तपास मपोउपनी गोदमले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here