आशाताई बच्छाव
सोनई येथे महारक्तदान शिबीर – स्व. नितिन दरंदले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
नेवासा ,(कारभारी गव्हाणे )- सोनई येथे पशुचिकित्सक सेवादाता असोसिएशन महाराष्ट्र राज्य, गोल्डन मेमरीज ग्रुप, स्नेह फाउंडेशन सोनई आणि मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई, कृषी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय नितीनभाऊ दरंदले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मा. सुनीलभाऊ गडाख, सभापती अर्थ व पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सतीश पालवे, डॉ. संपत खोसे, डॉ. बी.के. शिरसाठ, डॉ. योगेश वाघ, डॉ. अनिल कोरडे, दत्तात्रय लोहकरे, दिगुतात्या जाधव, सोनईचे सरपंच धनंजय वाघ शिशु चिकित्सक सेवादात्या असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष लांडे, पत्रकार विनायक दरंदले, सुनील दरंदले व सर्व मित्र मंडळ उपस्थित होते. यावेळी सुनिलभाऊ गडाख यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून यात रक्तदात्यांनी केलेले रक्तदान हे अनेकांचा जीव वाचवण्याचे काम करत असते. सर्व रक्तदात्यांना मनापासून नतमस्तक झाले पाहिजे असे म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने यांनी केले अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांनी केले. आभार प्रदर्शन अभिजीत दरंदले यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी एनसीसी ऑफिसर डॉ. सुरेश जाधव, एनएसएस अधिकारी डॉ. बाळासाहेब खेडकर व सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या शिबिरात एकूण १३०बॉटल रक्तदान झाले याकामी आनंदऋषीजी ब्लड बँकेचे डॉ. ऋषिकेश पाथरकर व त्यांच्या स्टाफने कामकाज पाहिले