Home नाशिक लासलगाव भाजप मंडलातर्फे ” भाजप चा विजय उत्सव जल्लोषात”–

लासलगाव भाजप मंडलातर्फे ” भाजप चा विजय उत्सव जल्लोषात”–

263
0

आशाताई बच्छाव

IMG_20231203_191348.jpg

लासलगाव भाजप मंडलातर्फे ” भाजप चा विजय उत्सव जल्लोषात”–

श्रीराम चौकात ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो हम तुम्हारे साथ है !या विजयी घोषणा देत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल असणाऱ्या पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा ने देशाचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री आणि आधुनिक चाणक्य आदरणीय अमित भाई शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे.पी.नड्डा यांचे सक्षम नेतृत्वामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या महत्वपूर्ण राज्यात एकहाती पूर्ण बहुमत मिळवले.याचा “विजय उत्सव जल्लोष “लासलगाव श्रीराम चौकात मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे , सरचिटणीस मनीष चोपडा, जिल्हा सरचिटणीस महिला स्मिता कुलकर्णी, मंडल उपाध्यक्ष रविंद्र होळकर, जिल्हा सरचिटणीस सुवर्णा जगताप ,जेष्ठ पदाधिकारी दतुलाल शर्मा ,गुजराती सेल जिल्हाध्यक्ष राजेंद्र राणा ,राजाभाऊ चाफेकर यांच्या नेतृत्वामध्ये साजरा करण्यात आला.
तीन राज्यात भाजपा झालेला विजय हा ऐतिहासिक असून देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी चे नेतृत्व निर्विवाद पणे मान्य केले आहे .आगामी 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व मध्ये आणि केलेल्या लोककल्याणकारी कार्या चे बला वर भाजपा +मित्र पक्ष 400 पेक्षा जास्त जागांवर विजयी होतील असा विश्वास या प्रसंगी यावेळी मंडल अध्यक्ष डी के जगताप, उद्योग आघाडी अध्यक्ष नितीन शर्मा, दीपक परदेशी, उपाध्यक्ष सोमनाथ गांगुर्डे, सुधीर झांबरे, विनोद ताथेड ,प्रदीप माठा ,नंदू जाधव, मंडल सरचिटणीस भारती महाले, जिल्हा सदस्य रूपा केदारे, शैलजा भावसार व जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

@@ भारतमाता की जय..!, वंदे मातरम..!, छत्रपती शिवाजी महाराज की..!, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..! नरेंद्र मोदी तुम आगे बढो देश तुम्हारे साथ हैं..! घोषणा नी संपूर्ण परिसर दुमदूमला यावेळी भाजपा तर्फे जोरदार फटाक्याची आतिष बाजी करण्यात आली तसेच मिठाई वाटप ही करण्यात आले.

Previous articleमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी ३० कोटींवरून आता ५०० कोटी रुपयांची शासन हमी
Next articleसोनई येथे महारक्तदान शिबीर – स्व. नितिन दरंदले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here