
आशाताई बच्छाव
नांदगाव प्रतिनिधी :(अनिल धामणे) नांदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन स्विय सहायक प्रवीण रौंदळ यांनी जामदरी भागातील पहाणी दौऱ्याप्रसंगी दिले. यावेळी जेष्ठ नेत्या ॲड जयश्री दौंड गणेश शिंदे उपस्थित होते
नांदगाव तालुक्यात रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे अगोदरच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या पिकांचे, घरांचे, जनावरांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या प्रकोपाची तत्काळ दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे स्वीय सहायक प्रवीण रौंदळ, ॲड जयश्री दौंड यांनी नांदगाव तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व सरसकट पंचनामे करावे अशा सूचनाही उपस्थित सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांना दिल्या आणि कोणत्या ही अधिकाऱ्याने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात कसूर केल्यास त्यांची गय केली जाणार नाही अशा सुचना यावेळी दिल्या. नामदार भारती पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे नुकसान भरपाई मिळुन देण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रौंदळ
यांनी शेतकऱ्यांना दिले.
यावेळी तालुका प्रमुख गणेश शिंदे भा.ज.पा च्या जेष्ठ नेत्या ॲड. जयश्री दौंड, सजन तात्या कवडे, माझी नगराध्यक्ष, राजाभाऊ बनकर, संदिप पगार, राजेंद्र गांगुर्डे, दिनेश दिंडे, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तथा भा.ज.पा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.