Home बुलढाणा EXCLUSIVE भाजपाचा काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ – मोताळ्यात मोठी राजकीय उलथापालथ विजयराज शिंदेंच्या...

EXCLUSIVE भाजपाचा काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ – मोताळ्यात मोठी राजकीय उलथापालथ विजयराज शिंदेंच्या नेतृत्वाची कमाल – काँग्रेसच्या गडात भाजपची घुसखोरी !

125

आशाताई बच्छाव

1001566532.jpg

EXCLUSIVE भाजपाचा काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ – मोताळ्यात मोठी राजकीय उलथापालथ विजयराज शिंदेंच्या नेतृत्वाची कमाल – काँग्रेसच्या गडात भाजपची घुसखोरी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मोताळा:- बुलडाणा मोताळा नगर पंचायतमध्ये मोठा सध्या राजकीय भूकंप घडला आहे. काँग्रेसचे उपनगराध्यक्ष शेख सलीम चुनावाले यांच्यासह सहा नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकत थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. नागपूर येथे आयोजित भाजपा विदर्भकार्यशाळेत प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष मा.आ. विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात या सर्वांनी अधिकृत प्रवेश केला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये
कैलास खर्चे, तस्लीम बाबा, संदीप वानखेडे, आसिफ कुरेशी, विजय सुरडकर यांचा समावेश् असून, सर्वजण काँग्रेसचे सक्रिय नगरसेवक होते. भाजपच्या कार्यपद्धतीने प्रभावित होत व जिल्हाध्यक्ष आमदार विजयराज शिंदे यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विशेष म्हणजे, आतापर्यंत मोताळा नगरपंचायतीत भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता. परंतु या एका घटनेने भाजपने काँग्रेसच् गडात थेट सेंध घातली असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येत्या काळात आणखी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अनिल बोंडे, खासदार अनुप धोत्रे, तसेच डॉ. गणेश मांटे, चंद्रकांत बरदे, दत्ता पाटील, पुरुषोत्तम लखोटिया यांची उपस्थिती होती

Previous articleमुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत उभारणार दहा कोटी चे पूल आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश
Next articleखाजगी सावकाराचा त्रासाला कंटाळून कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.