आशाताई बच्छाव
घृणास्पद ! ब्लॅकमेलिंग करून पाच महिने लैंगिक अत्याचार !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
संग्रामपूर :- बुलडाणा महिला सुरक्षिततेचा प्रश्न जिल्ह्यात ‘आ’ वासून उभा आहे. वासनांधपणा दिवसागणिक वाढत आहे. संग्रामपूर येथील एका घटनेने तर खळबळ उडवून दिली. विवाहितेचे चक्क आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ छुप्या मार्गाने काढून व्हायरल करण्याची धमकी देत पाच महिन्या पासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घृणास्पद घटना चव्हाट्यावर आली आहे.
याप्रकरणी 3 जून रोजी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी निलेश प्रल्हाद भवर वय 24 याने 2 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पीडित महिला याचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईल मध्ये चूप्या मार्गाने काढले. याचा महिलेला संशय आल्याने आरोपीने तेथून पळ काढला. परंतु दुसऱ्या दिवशी सदर महिलेच्या घरी जाऊन फोटो, व्हिडिओ दाखवून शरीर सुखाची मागणी आरोपीने केली. नकार दिल्यास सर्व फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित महिलेकडे काही उपाय नव्हता. आरोपीने वेळोवेळी तिला मानसिक त्रास दिला. 7 जानेवारी रोजी आरोग्य भरावी तिची विरुद्ध शारीरिक अत्याचार केला. 13 जानेवारी रोजी एकटी शेतात असताना पुन्हा अत्याचार केला. अशाप्रकारे सात-आठ वेळा आरोपीने तिच्यावर जबरदस्ती आत्याचर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.






