Home भंडारा वंचित बहुजन आघाडीची आलेबेदर परिसरात सभा

वंचित बहुजन आघाडीची आलेबेदर परिसरात सभा

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20231118_173405.jpg

वंचित बहुजन आघाडीची आलेबेदर परिसरात सभा

 

संजीव भांबोरे जिल्हाप्रतिनिधी भंडारा 

भंडारा- वंचित बहुजन आघाडी तर्फे आलेबेदर परिसरात सभा घेण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्ह्यातील अध्यक्ष सतीश बनसोड होतें. तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, महीला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे होते . यादवराव गणवीर, राजू शहारे, गणेश गजभिये,शितल नागदेवे, स्वर्णमाला गजभिये इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. वंचित बहुजन आघाडीचे व वंचीत बहुजन आघाडी धेय धोरणे जनसामान्य पर्यंत कसं पोहोचवता येईल आणि चळवळ जोमाने कसे वाढवता येईल याविषयी चर्चा करण्यात आली .कार्यक्रमाचे संचालन तालुका सचिव शितल नागदेवे यांनी केले .तर आभार स्वर्णमाला गजभिये यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तनुजा नागदेवे, महिला जिल्हा उपाध्यक्ष शीला मळामे, अमित नागदेवे,यादवराव गणवीर, गणेश गजभिये, स्वर्णमाला गजभिये, शितल नागदेवे मॅडम व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते .
सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here