Home नागपूर नागपूर येथे बहुजन समाज पार्टी च्या वतीने विदर्भ स्तरीय कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन...

नागपूर येथे बहुजन समाज पार्टी च्या वतीने विदर्भ स्तरीय कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन 17 नोव्हेंबरला

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20231117_051555.jpg

नागपूर येथे बहुजन समाज पार्टी च्या वतीने विदर्भ स्तरीय कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन 17 नोव्हेंबरला

बसपाचे नॅशनल कार्डिनेटर आकाश आनंद उपस्थित राहणार

नागपूर( संजीव भांबोरे) बहुजन समाज पार्टी च्या वतीने विदर्भस्तरीय कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन 17 नोव्हेंबर 2023 ला सकाळी अकरा वाजता नागपूर येथील मनपाचे कविवर्य सुरेश भट सभागृहात रेशीम बाग नागपूर येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून बसपाचे नॅशनल कॉर्डिनेटर आकाशजी आनंद मुख्य मार्गदर्शक तथा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत .तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ अशोक सिद्धार्थ केंद्रीय कोऑर्डिनेटर महाराष्ट्र तथा माजी खासदार ,नितीन सिंहजी केंद्रीय कोऑर्डिनेटर महाराष्ट्र प्रदेश बसपा , एडवोकेट संदीप ताजने प्रदेश अध्यक्ष बसपा, प्रदेश प्रभारी सुनील डोंगरे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत .करिता कार्यक्रमाला नागपूर जिल्हा ,भंडारा जिल्हा ,गोंदिया जिल्हा ,चंद्रपूर जिल्हा ,गडचिरोली जिल्हा, अमरावती जिल्हा ,अकोला जिल्हा ,यवतमाळ जिल्हा ,बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा ,वर्धा जिल्हा व सर्व विधानसभा सेक्टर , बुथ कमिटी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आलेले आहे.

Previous articleगुडमॉर्निंग मित्र मंडळ तर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा
Next articleपत्रकारांची शासन दरबारी तमाम पत्रकाराचे नावाची नोंदणी करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे निवेदन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here