Home भंडारा अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार माडगी येथील मुख्यचौकातील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार माडगी येथील मुख्यचौकातील घटना

148
0

आशाताई बच्छाव

IMG_20231116_051428.jpg

अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार

माडगी येथील मुख्यचौकातील घटना

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) तुमसर तालुक्यातील तिरोडा गोंदिया राष्ट्रीय महामार्गांवरील माडगी येथील मुख्य चौकात अज्ञात पीकअप च्या धडकेत सायकल वरून जाणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दुपारी चार वाजता च्या सुमारास घडली.
सुखदेव राघो नवदेवे (वय ७०) रा. माडगी असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सुखदेव राघो नवदेवे यांच्या सायकलला अज्ञात पीकअप वाहनाने जोरात धडक दिली.दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये नवदेवे हे माडगी रस्त्यावरील मुख्य चौकात काही अंतरावर जाऊन पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे
मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटना तुमसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तुमसर पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

Previous articleअमरावती विभागातील ६४ शाळा वर्ग खोल्याचा दीड कोटी तून  कायापालाट.
Next articleगुडमॉर्निंग मित्र मंडळ तर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here