Home भंडारा दिवाळीचे आरोग्यदायी शास्त्रशुद्ध महत्त्व….. डॉ.अक्षय कहालकर, एम.डी. (कआरओ) कायरोप्रॅक्टर व निसर्गोपचार तज्ज्ञ

दिवाळीचे आरोग्यदायी शास्त्रशुद्ध महत्त्व….. डॉ.अक्षय कहालकर, एम.डी. (कआरओ) कायरोप्रॅक्टर व निसर्गोपचार तज्ज्ञ

41
0

आशाताई बच्छाव

IMG_20231112_114641.jpg

दिवाळीचे आरोग्यदायी शास्त्रशुद्ध महत्त्व…..
डॉ.अक्षय कहालकर,
एम.डी. (कआरओ)
कायरोप्रॅक्टर व निसर्गोपचार तज्ज्ञ

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)– दिवाळी किंवा दीपावली हा दिव्यांचा हिंदू सण आहे, इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. ते आध्यात्मिक “अंधारावर प्रकाशाचा विजय, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा” प्रतीक आहे. दिवाळी हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार ) आणि कार्तिक या महिन्यात साजरी केली जाते. हे उत्सव साधारणपणे पाच किंवा सहा दिवस चालतात.

आयुर्वेदशास्त्र आणि भारतीय संस्कृती यांची सांगड प्रत्येक बाबतीत अनुभवास येते. परंपरेनुसार व संस्कृतीनुसार घरोघरी तयार केले जाणारे दिवाळीचे पदार्थ आणि हिवाळ्यात आयुर्वेदानुसार खायला सांगितलेले पदार्थ एकमेकांशी तंतोतंत जुळतात. प्राचीन काळापासून आपण उत्साहाने साजरी करीत असलेली दिवाळी हिवाळ्याच्या सुरुवातीला येते. तसेच दिवाळीमध्ये सांगितलेले अभ्यंग स्नान हे विशेषतः त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मात्र सद्यस्थितीत दिवाळीच्या कालावधीत सुटीचे निमित्त साधून सहलीला जाण्याची प्रथा सुरू झाली आहे. व आरोग्या विषयी असलेले महत्व जाणून न घेता दुर्लक्ष करतोय यामुळे संस्कृती कुठे तरी लोप पावत आहे का असा प्रश्न पडतो. पण जर शास्त्र समजून घेऊन आपण हा सण साजरा केला तर त्याचा आपल्याला शारीरिक, आध्यात्मिक दृष्ट्या लाभच होणार आहे. आपल्या संस्कृतीने एवढा नयनरम्य आणि डोळे दीपवणारा दिलेला दीपोत्सव केवळ मजा करण्याच्या नावाखाली धूर आणि आवाज यांच्या अतिरेकात वाया न घालवता दिवाळीच्या दिवसांत अधिकाधिक साधना (म्हणजेच नामजप, प्रार्थना, सत्सेवा, दान आदी) करण्याचा प्रयत्न करावा. दीपावलीच्या निमित्ताने समाज, राष्ट्र अन् धर्म यांसाठी काहीतरी करण्यासाठी यथाशक्ती पाऊल उचलले, तरच हा सण खर्‍या अर्थाने साजरा होईल.

नैतिक मुल्यांचा विकास, समस्या निराकरण कौशल्य, भाषिक कौशल्य, मानस प्रतिमा निर्मिती कौशल्य अशा अनेक कौशल्यांचा विकास होण्यास या चालना मिळते. यासाठी घरातील प्रौढांनी मुलांना त्यांच्या योग्य अशा कृती व संभाषणात समाविष्ट करून घेतले पाहिजे. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या परदेशी बनावटीच्या वस्तूंची खरेदी व स्थानिक कारागिरांनी बनविलेल्या वस्तू यांची खरेदी या विषयी चर्चा करून राष्ट्रभक्ती व अर्थकारण यांचे बिजांकुरण आपण करू शकतो. फटाक्यांच्या अतिवापरामुळे होणारा पर्यावरण ऱ्हास याविषयी बोलून आपण बालकांमध्ये सामाजिक जागृतीची पायाभरणी करू शकतो. लेव व्हीगॉस्त्की या रशियन मानसशास्त्रज्ञाने बालविकासाचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडला होता. त्यानुसार बालकाच्या बोधात्मक विकासावर संस्कृती, पालक, समाजाचा सहभाग या घटकांचा परिणाम होतो. या सर्व घटकांचा सहवास दिवाळी सणात बालकाला विशेषतेने व अधिक काळ लाभत असतो. या दिवाळीत मुलांना अधिकाधिक कृती व संभाषणात स्थान देऊन बालविकासाला अधिक पोषक असे वातावरण उपलब्ध करून देवू शकतो.

*दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे ते या प्रमाणे*

*वसुबारस*
भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.

*धनत्रयोदशी*
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

*नरक चतुर्दशी*
नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.

*लक्ष्मीपूजन*
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.

*बलिप्रतिपदा*
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात.

*गोवर्धन पूजा*
मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.

*भाऊबीज*
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here