Home नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार.!साकुरीत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न!!

सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार.!साकुरीत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न!!

120
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20221112-172623_Video-Player.jpg

सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार.!साकुरीत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न!!
राजेंद्र पाटील राऊत
(युवा मराठा न्यूज नेटवर्क )
नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात आज दुपारी अत्यंत खळबळजनक घटना घडली.साकुरी बिरोबा मंदिराजवळील प्रिंपाळे रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे काढण्यासाठी पोहचलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना एका तरुणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नात माघारी परतावे लागले. याबाबत सविस्तर माहिती अशी की,आज शनिवारी दुपारी मालेगांवचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तालुका पोलिस स्टेशनच्या फौजफाटयासह साकुरी (नि.) येथील अतिक्रमण काढण्यासाठी दाखल होताच,त्या गावातील हातावर पोट असलेल्या न्हावी समाजातील मेघराज विठ्ठल मोरे या युवकांच्या टपरीवजा दुकानाची जे.सी.बी.मशिनव्दारे तोडफोड केल्याने,संतप्त व उदीग्न झालेल्या मेघराज मोरे या युवकाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मेघराज यास तात्काळ पुढील उपचारासाठी मालेगांवच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.तर साकुरी ग्रामस्थांनी “युवा मराठा न्युज”शी बोलताना गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत गावकीच्या राजकारणात सरपंच भानूदास चोरगे,अशोक कानडे,गोरख ठोके,ऋतीक ठोके,व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने ही कारवाई करण्यात आल्याने आज एका गरीब व बहुजन समाजातील युवकाला आपल्या प्राणाशी जीवन मरणाचा खेळ करावा लागला.वास्तविक धनदांडग्या व गर्भश्रीमंताचे अतिक्रमण न तोडता मेघराजसारख्या हातावर पोट असलेल्या युवकाच्या दुकानाचे नुकसान केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची मनमानी व गलथान कारभार चव्हाट्यावर आला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Previous articleदु:खद निधन वार्ता राजाराम सखाराम पाटील बोडके यांचे दुःखद निधन.
Next article50 लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here