Home जळगाव नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेची तक्रार मुख्यमंत्री, समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे करणार...

नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेची तक्रार मुख्यमंत्री, समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे करणार – आमदार मंगेश चव्हाण

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20231008-WA0071.jpg

नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेची तक्रार मुख्यमंत्री, समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे करणार – आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – शहरातील डेराबर्डी जवळ असणाऱ्या नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेला दी 7 रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी अचानक भेट दिली असता अतिशय विदारक चित्र त्याठिकाणी निदर्शनास आले आहे
सदर निवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः आपण गुरांना खाऊ नाही घालत अश्या सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण बनवले जात असल्याचे माझ्या लक्षात आले. कांदा सडलेला, कोबी किडलेली, बिट सडलेले, गिलके पिकलेले, तांदूळ खराब असल्याने यापासून बनवलेले जेवण विद्यार्थ्यांना देणे म्हणजे त्यांच्या जीवाशी एकप्रकारे खेळ आहे. या गंभीर बाबींची तक्रार मुख्यमंत्री महोदय, समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे करणार असून यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच यापुढे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे जेवण, चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील. असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले आहे.

Previous articleभाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय पाटील
Next articleविद्यार्थ्यांनी स्वतःतील न्यूनगंड कमी करून आपल्या भाग्याचे शिल्पकार बनले पाहिजे – मॅनेजमेंट गुरु प्रशांत पुप्पल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here