Home गडचिरोली सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी...

सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.

194

आशाताई बच्छाव

IMG-20220927-WA0054.jpg

सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा….

खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.

सिंदेवाही तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामा बाबत अधिकाऱ्यांना धरले धारेवर…
प्रलंबित विकास कामे खपवून घेणार नाही?
खासदार अशोकजी नेते

सिंदेवाही/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :-मा.खा.अशोकजी नेते यांनी तालुका सिंदेवाही येथील समस्त प्रशासकीय अधिकारी यांना केंद्र सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी करा,अशा सुचना या प्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी उपस्थित समस्त प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या.
सिंदेवाही पंचायत समिती सभागृह येथे प्रशासकीय अधिकारी यांच्या आढावा बैठकीच्या प्रसंगी खासदार अशोकजी नेते बोलतांना सांगितले सिंदेवाही तालुका चंद्रपूर जिल्ह्यातील मोठा व्यापारी वर्ग व तालुका आहे येथील तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे असे प्रतिपादन केले ,प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे व अविकसित क्षेत्राचा विकास झाला पाहिजे व विविध सोयी सुविधा देण्यासाठी , प्रलंबित विकास कामांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.अशी तंबी उपस्थित अधिकारी यांना दिले ,अधिकाऱ्यांना विविध प्रलंबित समस्या बाबत खा, नेते यांनी चांगलेच धारेवर धरले.
यावेळी प्रामुख्याने खासदार अशोक भाऊ नेते यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले

यावेळी मा.खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली .

या आढावा बैठकीला उपस्थित.मा.खा.अशोकजी नेते, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, मा.अतुलभाऊ देशकर माजी आम.ब्रम्हपुरी,ता.अध्यक्ष मा. राजेंद्र बोरकर,माजी सभापती स.क.मा. नागराजजी गेडाम, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओ.आ.अविनाश पाल, उपकार्यकारी अधिकारी कल्होडे साहेब, तहसिलदार गणेश जगदाळे, बिडिओ अक्षय सुकरे, यु.मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा माजी.पं.स.सदस्य रितेशजी अलमस्त, कमलाकर सिद्धमशेटिवार जेष्ठ नेते,मनोहर सहारे ता.महामंत्री,मधुकरजी मडावी माजी सभापती,अरविंद राऊत सर माजी सभापती, किशोर भरडकर,देवराव कोठेवार,देवा मंगलवार,आशिष चिंतलवार,पंकज लाडवे, पुस्तोडेताई नगरसेविका, चिंतलवारताई नगरसेविका,तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.