
आशाताई बच्छाव
सरकारमान्य चोरांमुळे जळगाव भकास!, 5 वर्षात जळगांव चे खासदार उन्मेष पाटील यांना जळगावकरांनी बघितलेच नाही, हे महाभयानक सत्य…
विभागीय संपादक, योगेश पाटील.
जळगांव शहरातील महाराष्ट्र जागृत जनमंच चे शिवरामदादा पाटील यांनी जळगांव शहराच्या नागरिकांसोबत घेऊन मांडली जळगांव शहरात बनलेल्या रस्त्यांची कैफियत.
जळगाव शहरातील रिंग रोड आणि गणेश कॉलनीचा चौक. रस्ता बनवला आणि फक्त चारच महिन्यात रस्ता उखडला. येथे डांबर कमी टाकली, याचे डांबर कोणी चोरले? यांचें कमीशन कोणी खाल्ले?
आमदार सुरेश भोळे जनतेशी खोटे बोलले.२८६कोटी निधी आणला. रस्ते तर कंडेम बनवले. मग निधी गेला कुठे? आमदार भोळेंनी किती कमीशन खाल्ले ? पालकमंत्री गुलाबराव ने किती कमीशन खाल्ले? मुख्यमंत्री शिंदेंना किती कमीशन दिले? जर यांनी कमीशन खाल्ले नसेल तर मग, काय सार्वजनिक बांधकाम चे अभियंता प्रशांत सोनवणे यांनी एकटे कमीशन पचवले असेल काय? सोनवणेंनी कमीशन घेतले नसेल तर काय मक्तेदाराने बेईमानी केली काय? या चारपैकी एकाही माणसाने प्रामाणिकपणे उत्तर दिले नाही.
नागरिकांनो, ही माणसे स्वताला कितीही मोठी म्हणत असतील, यांना पोलीस आणि कोर्ट संरक्षण देत असतील तरीही ही माणसे आपला कराच्या पैशातून निर्माण झालेला निधी चोरतात. हे येथे सिद्ध होत आहे. जळगांवमधील भग्न रस्ते आणि या माणसांची वाढलेली संपत्ती यांचा शोध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का घेत नाहीत? या कमीशनखोरांवर इडीची कारवाई का करीत नाही. का? कारण, ही माणसे मोदींचे समर्थक आहेत. म्हणून मोदी यांचे संरक्षक बनलेले आहेत. ते फक्त विरोधी पक्षातील चोरांवर इडीची कारवाई करतात. स्वताचे समर्थकांना चोरीची मुभा देतात.
रात्री चोरी झाली तर पोलिस अटक करतात. कोर्ट जेलमधे टाकतात. तर मग,दिवसा चोरी करणाऱ्यांना पोलिस का पकडत नाहीत? कोर्ट यांना जेलमध्ये का टाकत नाहीत? कारण हे सरकारमान्य चोर आहेत. हे नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत. हे एकनाथ शिंदेंचे साथीदार आहेत.
सायकल चोरणाऱ्या चोरांपेक्षा हे रस्ते चोरणारे जास्त खतरनाक बनलेले आहेत. जनतेला राग तर येणारच !
शिवराम पाटील. महाराष्ट्र जागृत मंच, जळगांव.