Home नाशिक सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांना अटक

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांना अटक

187

आशाताई बच्छाव

1001377165.jpg

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांना अटक
देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी: विवाहाला अवघे सात महिने झाले असताना सासरच्या जाचाला कंटाळून येथील इंदिरानगरमधील एका नवविवाहितेने आपले जीवन संपवले. दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याने तिने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
देवळा पोलीस ठाण्यात शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबिका मयुर पवार (वय १९)रा. इंदिरानगर, देवळा) हिच्यावर सासरच्या मंडळींकडून पैशासाठी वारंवार छळ केला जात होता. पती मयुर अंबादास पवार, सासू निर्मला अंबादास पवार, सासरे अंबादास पंडित पवार आणि नणंद पिंकी अंबादास पवार यांनी संगनमत करून अंबिकाला माहेरहून वीस हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. पैसे न मिळाल्याने तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती. ३१ मार्च २०२५ रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हाकलून दिल्याने ती शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे गेली आणि १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अंबिकाने आपल्या आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आई सखुबाई हिने पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवले व उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलवण्यात आले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. देवळा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आले.
या प्रकरणी फिर्यादी शंकर वसंत पवार (वय ३२, रा. इंदिरा नगर, देवळा) यांच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८०, ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.

फोटो :

Previous articleकोठला परिसरात एकास बेदम मारहाण
Next articleईसाफ बँक तर्फे अभिषेक मेश्राम यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.