Home जळगाव चालकासह मोटारसायकल कन्नड घाटात कोसळली – महामार्ग पोलीसांनी जखमीला काढले वर..

चालकासह मोटारसायकल कन्नड घाटात कोसळली – महामार्ग पोलीसांनी जखमीला काढले वर..

107

आशाताई बच्छाव

1001306704.jpg

चालकासह मोटारसायकल कन्नड घाटात कोसळली –
महामार्ग पोलीसांनी जखमीला काढले वर..

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – कन्नडकडून शिवापूर चाळीसगावकडे येणार्‍या मोटारसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने चालक मोटारसायकल सह कन्नड घाटात 300 फुट खोल दरीत पडल्याची घटना दि 5 रोजी दुपारी 1-30 वाजेच्या सुमारास घडली होती .
या घटनेची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच
सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, हवालदार योगेश पवार, शेषराव राठोड, संदीप जगताप यांनी खोल दरीत जावून हवालदार योगेश पवार यांनी या जखमी दुचाकीस्वाराला खांद्यावर उचलत घाट चढून वर आणून त्यास रूग्णालयात उपचारार्थ रवाना केले.
घटनेची माहिती अशी की, गोरख शिवराम राठोड (48) हा व्यक्ती कन्नडकडून शिवापूर चाळीसगावकडे त्याची मोटारसायकल MH-52 A-1075 ने येत असतांना कन्नड घाटात मेणबत्ती पॅाईंटजवळ त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले व तो मोटारसायकल सह 300 फूट खोल दरीत कोसळला होता.

Previous articleरोटरी क्लब ऑफ चाळीसगाव ने केला अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सन्मान
Next articleगुत्ती ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.