Home गडचिरोली संयुक्त किसान मोर्चाने साजरा केला काळा दिवस केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी...

संयुक्त किसान मोर्चाने साजरा केला काळा दिवस केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0056.jpg

 

संयुक्त किसान मोर्चाने साजरा केला काळा दिवस

केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध

गडचिरोली,(सुरज गुंडमवार विभागीय संपादक) :- शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी लखीमपूर खिरी येथे आयोजित आंदोलना दरम्यान तीन शेतकरी आणि एका पत्रकाराला आपल्या गाडीने चिरडून मारणाऱ्या अजयसिंग टोनी मिश्रा यांच्या मुलावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने संयुक्त किसान मोर्चातर्फे स्थानिक गांधी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आले.

यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. मोदी सरकार मुर्दाबाद, शिंदे सरकार मुर्दाबाद, शेतकरी हत्यारा मंत्रीपुत्र आशिष मिश्रा याला अटक करा, केंद्रीय गृहमंत्री अजयसिंग मिश्रा यांना पदावरून दूर करा, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यादरम्यान काॅ. महेश कोपूलवार, रोहिदास राऊत, भाई रामदास जराते, काॅ. देवराव चवळे, राज बन्सोड, काॅ. अमोल मारकवार यांनी मार्गदर्शन केले. निषेध निदर्शने कार्यक्रमानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. केंद्र सरकारने तीन काळे कायदे आणले ते परत घ्यावे व शेतकऱ्याला शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव द्यावा, केंद्र सरकारने आणलेला वीज बिल विधेयक परत घ्यावा , शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू वर आकारण्यात येणारा १८ टक्के जीएसटी रद्द करावा, शेतकरी, शेतमजूर यांना वयाच्या साठ वर्षानंतर ५ हजार रुपये पेन्शन मिळण्याचा कायदा करावा या मागण्याही करण्यात या निवेदनात करण्यात आल्या.

निषेध आंदोलना वेळी प्रा. प्रकाश दुधे, भाई शामसुंदर उराडे, रोहिदास कुमरे, जयश्रीताई वेळदा, हंसराज उंदीरवाडे, भाई अक्षय कोसनकर, प्रतिक डांगे, केशवराव सामृतवार, अशोक खोब्रागडे प्रकाश खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, संजय वाकडे, केवळराम नागोसे, सचिन जंबेवार, सुजित आखाडे, निता सहारे, विजय देवतळे, तुळशीदास भैसारे, देवेंद्र भोयर, विश्वनाथ म्हशाखेत्री, रेवनाथ मेश्राम, अशोक किरंगे, भास्कर ठाकरे, राजकुमार प्रधान, विनोद गेडाम, उमाजी मुनघाटे, ज्योती उंदीरवाडे, सुरेश फुकटे, हरिदास सिडाम, महेंद्र जराते, आकाश आत्राम, विनोद उराडे यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Previous article_उप जिल्हा रुग्णालय धानोरा ला नऊ कोटी रुपये निधी मंजूर करून पन्नास खाटांचे भूमिपूजन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते संपन्न_
Next articleपाथरवाला  गावातील प्रमुख रस्त्याच्या कामास सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here