Home नांदेड खळबळ उडून देणारी सर्वात मोठी बातमी कळव्यानंतर नांदेड मध्ये सरकारी रुग्णालयामध्ये 24...

खळबळ उडून देणारी सर्वात मोठी बातमी कळव्यानंतर नांदेड मध्ये सरकारी रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्ण दगावल्याने पुन्हा महाराष्ट्र हादरला

124
0

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0037.jpg

खळबळ उडून देणारी सर्वात मोठी बातमी कळव्यानंतर नांदेड मध्ये सरकारी रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्ण दगावल्याने पुन्हा महाराष्ट्र हादरला नांदेड- (संजय कोकेंवार ब्युरो चीफ) डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या नावाने मोठ्या उद्देशाने विष्णुपुरी येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ही दुर्दैवी आहे.ही घटना कमी औषधाच्या तुटवड्यामुळे झाल्याचे उघड झाले आहे.या घटनेची वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत चौकशी होईलही परंतु या ठिकाणी सहा जिल्ह्यातून दररोज रुग्ण दाखल होणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांची संख्या पाहता येथे पुरेसा औषधी साठा व तज्ञ डॉक्टरांच्या सक्षम टीमसह दर्जा आणि सुविधाची वाढ होणे आवश्यक आहे. भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून तज्ञ डॉक्टरांची टीम पाठविली आहे.अधिष्ठता डॉ. एस.आर.वाकोडे यांच्याकडून माहिती घेतली असता,त्यांनी असे सांगितले की,या रुग्णालयात दररोज पाच ते सहा रुग्णाचा मृत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतात.गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होताना अगोदरच अत्यावश्य असतात.त्यामुळे त्यांच्या आजारावरील धोका वाढलेला असतो.अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या उपलब्ध मनुष्यबळाद्वारे जास्तीत जास्त चांगले उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो.मागील चार ते पाच दिवसापासून सलग सुट्टी असल्यामुळे नांदेड आणि आसपासच्या ठिकाणाचे डॉक्टर बाहेरगावी गेले आहेत.त्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये अति गंभीर रुग्णांना दाखल होता आले नाही.मागील तीन दिवसात जे जास्त संख्येने मृत्यू झाले,त्यांच्या आजाराची कारणे वेगवेगळी आहेत.डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे अंथवा औषधीच्या कमतरतेमुळे कोणताही मृत्यू झालेला नाही.अशी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना सांगितले. पण या घटनेने परत एकदा नांदेड जिल्हा व महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे.

Previous articleउपनगर ते नाशिक रोड व जय भवानी रोड रस्त्यावर खड्डेच खड्डे
Next articleराजबाई शेवाळीच्या शाळेत अवतरले गांधीजी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here