Home उतर महाराष्ट्र ककाणीच्या माध्यमिक विद्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मंजुषा पगारे यांचा सत्कार संपन्न!

ककाणीच्या माध्यमिक विद्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मंजुषा पगारे यांचा सत्कार संपन्न!

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20230930-WA0062.jpg

म्हसदी,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे):–विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळ खेळले पाहिजेत. खेळाने मन प्रसन्न होते. व्यायाम होतो शिवाय आरोग्यही चांगले राहते. म्हणून जीवनात आनंदी राहण्यासाठी खेळ महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी क्रीडा राज्य पुरस्कार प्राप्त बेसबाॅल खेळाडू मंजुषा पगारे यांनी केले. ककाणी ता. साक्री येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात राज्य पुरस्कार प्राप्त क्रिडापटू मंजुषा पगारे सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ककाणी येथील साने गुरुजी शैक्षणिक संस्थेचे चेअरमन तथा प्राथमिक शिक्षक शिवाजी सोनवणे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव उत्तमराव बेडसे, संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बारकू बेडसे,एन.डी. शिंदे, रवींद्र बेडसे, वनसमितीचे अध्यक्ष निंबा नाना बेडसे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यध्यक्ष तानाजी शिंदे, विनायक बेडसे, मनोहर बेडसे, काकाजी बेडसे, कल्याणी बेडसे, जयश्री बेडसे, पुष्पांजली बेडसे आदी उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक भटू वाणी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर क्रीडापटू पगारे म्हणाल्या की, मी शेतकरी कुटुंबातील आहे. मी खेळात चांगले प्रयत्न केले. त्यात यश मिळाले आणि मला राज्याचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आपण चांगले प्रयत्न केले तर यश निश्चितच मिळते असे. पगारे यांनी नमूद केले. त्यानंतर संस्थेचे सचिव तथा प्राथमिक शिक्षक उत्तमराव बेडसे यांनी खेड्यातील विद्यार्थी देखील कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. म्हणून ग्रामीण विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे स्पष्ट केले. यावेळी पी.डी. शेवाळे, जी.एम. मारणर, बी.आर. सोनवणे, प्रसाद बेडसे, सुषमा महाले, दीपक पवार,बापू गायकवाड, दयाराम पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.व्ही. देवरे यांनी तर आभार व्ही.वाय. कुवर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here