Home नांदेड गणपती बप्पा मोरया…, पुढच्या वर्षी लवकर या… म्हणत आपल्या लाडक्या

गणपती बप्पा मोरया…, पुढच्या वर्षी लवकर या… म्हणत आपल्या लाडक्या

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20230929-WA0028.jpg

गणपती बप्पा मोरया…, पुढच्या वर्षी लवकर या… म्हणत आपल्या लाडक्या

“श्री गणपती बप्पाला मुक्रमाबादकरांनी दिला निरोप”

मुक्रमाबाद/बसव्वप्पा वंटगिरे

मखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे परंपरेनुसार अनंत चतुर्थी दिवशी गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी अनेक गणेश मंडळांच्या गणरायांचे जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत फटाक्यांच्या आतीषबाजीत “भव्य मिरवणुकांद्वारे गुलाल, फुलांची उधळण करीत विसर्जन करण्यात आले.

ई. स. १९७६ पासुन पंरपरा असणारी विरभद्र मंदिरातील गणपतीची आरती मा.भालचंद्र तिडके साहेब व दिनेश शिवराजअप्पा आवडके तसेच वंटगिरे परीवार यांच्या हस्ते करण्यात आले मंदिरातील आरतीला गल्लीतील असंख्य महीला व पुरूष उपस्थित होते सुरज खळुरे शिवप्पा वंटगिरे,राजलिंग वंटगिरे,पिंटु थळपत्ते,शुभम थळपत्ते, किरण थळपत्ते, यांनी परीश्रम घेतले.
भवानी चौकातील खडकेश्र्वर चा राजा मानाचा गणपतीच्या मूर्तीचे पूजन पोलीस स्टेशनचे api मा.भालचंद्र तिडके साहेब, गजानन कागने साहेब मंडळाचे अध्यक्ष बालाजी पसरगे यांच्या सह सभासदांच्या हास्ते आरती करण्यात आले याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित राजकीय नेते, व्यापारी, शेतकरी मंडळी, कर्मचारी उपस्थित होते .
खडकेश्र्वर चा राजा,शंकर नगर,आवडके गल्ली,बोधने गल्ली,नविन मार्केट,जुना मार्केट,वरटी गल्ली,इंदूरे गल्ली,विरभद्र मंदिर,पंचाक्षरे गल्ली,भोई गल्ली,वड्डर गल्ली.गुमडे गल्ली, बालाजी मंदिर,खंकरे गल्ली,विरहनुमान,जय शिव नगर,इतर गणेश मंडळाचे
अनेकांचे देखावे पाहण्यासाठी मिरवणुकीच्या चारी बाजुने भक्तांनी गर्दी केली होती. भवानी चौकात पोलिस स्टेशन मुक्रमाबाद च्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते.प्रतेक गणेश मुर्ती ला व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार पोलिस स्टेशन मुक्रमाबाद तर्फे पोलिस साह्यक मा.भालचंद्र तिडके व कागने साहेब यांनी केले.
या श्री च्या विसर्जनाच्या प्रसंगी ढोल ताशांचा प्रचंड गजर, पारंपरिक हलगीचा ठेका रांगाच्या आवाजावर गुलालाची उधळण करत बाप्पाच्या जयघोषाने गुरुराज माऊली पावलांनी अवघे मुक्रमाबाद शहर दुमदुमून निघाले होते. मिरवणुकीत हातात भगवे ध्वज घेऊन गणेश मंडळांचे भक्त नाचत जय घोष देत होते. त्यांच्या मंडळापुढे लयबद्ध पावलांनी नृत्य करताना दिसत होते. विविध राजकीय पक्ष व समाजिक संघटनेचे स्वागत करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. शहराच्या विसर्जनाच्या मार्गाने विविध ठीकाणी ग्रामपंचायत कार्यालय मार्फत वीधुत रोषणाई करण्यात आली होती.गणपतीचे विसर्जन शहराच्या महादेव मंदिर खडकेश्र्वर लगत लेंडी नदीच्या पात्रात गणरायांचे विसर्जन करण्यात आले.या ठीकाणी पोलिस निरीक्षक तिडके साहेब व पोलिस उपनिरीक्षक गजानन कागने साहेब बिट जमादार आडेकर शरीफ पठाण यांनी विसर्जन साठी भोईराज यांची टीम तैनात ठेवली होती यांच्यासह पोलिस बंदोवस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने विसर्जन शांततेत पार पडली.

Previous articleमालेगाव शहर येथे एकता मंडळाची श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले
Next articleदापोडीतील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी स्वराज्यातील मावळ्यांचे वंशज यांची उपस्थिती…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here