Home नाशिक देवगाव अंगणवाडी केंद्रात पोषण अभियान कार्यक्रम

देवगाव अंगणवाडी केंद्रात पोषण अभियान कार्यक्रम

102
0

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0082.jpg

देवगाव अंगणवाडी केंद्रात पोषण अभियान कार्यक्रम

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

देवगाव अंगणवाडी क्र. १, महादेव नगर, आदिवासी वस्ती अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प निफाड अंतर्गत पोषण महा अभियान 2023 कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांचे बुटकेपणा कमी करणे ,15 ते 45 गटातील स्त्रियांत रक्तशयाचे प्रमाण कमी करणे, शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर करणे.ही पोषण अभियानाची उद्दिष्टे महिलांना समजून देण्यात आली.
प्रसंगी बालकांना विविध वेशभूषेने नटून भाजी पाल्यांची टोपली आणि बालकांच्या गळ्यात विविध फळांच्या माळा घालून फेरी काढण्यात आली.फेरीत सही पोषण देश रोशन , हर घर पोषण उत्सव, कुपोषण निर्मूलन झालेच पाहिजे, ही फलके घेऊन घोषणा देण्यात आल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका जुबेदा काद्री, मनीषा सोनवणे,अलका आवडे ,महानंदा मोरे,संगीता आव्हाड, सरला घेगडमल यांनी परिश्रम घेतले.बाल विकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे व मुख्य सविका अनिता काकडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleप्राचार्य सी डी रोटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित होणार 
Next articleचासनळी विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here